Mount Everest : श्रीगोंदा : आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी (Best performance) करुन त्या क्षेत्रातील माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) गाठले, तर तुमच्या जीवनाचे सोने होईल, असे सांगत माऊंट एव्हरेस्टचा टप्पा पार करताना मोठा दगड कानाजवळून गेला, अंगाचा थरकाप उडाला, क्षणभर डोळे झाकले पण अडचणीवर मात करुन माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पोहचत नऊवारी साडी नेसून तिरंगा व फगवा ध्वज फडकविला, तो जीवनातील सुवर्ण दिन ठरला, अशी माहिती नगर जिल्ह्यातील पहिली माऊंट एव्हरेस्टवीर सुविधा कडलग (Suvidha Kadalag) यांनी श्रीगोंदा येथे बोलताना केले.
हे देखील वाचा: ‘संपदा पतसंस्था’ अपहार प्रकरणी वाफारेसह २२ जण दोषी
अग्नीपंख फौंडेशचा उपक्रम (Mount Everest)
अग्नीपंख फौंडेशनकडून प्रेरणा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे होते. यावेळी एक मुठ धान्य अनाथांसाठी या उपक्रमात सहभागी झालेल्या शाळा, विद्यालयांचा सन्मान करण्यात आला.
नक्की वाचा: कर्जदाराची दोन कोटी रक्कम परस्पर वर्ग केली सावकाराच्या खात्यात
सुविधा कडलग म्हणाल्या (Mount Everest)
त्यांना भारतीय सैन्यदलात किंवा धावपटू म्हणून करिअर करायचे होते. मात्र, अपयश आले आणि त्यांचे लग्न झाल्याचे सांगत संसाराचा गाडा सर करताना माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची तयारी सुरू केल्याचे सांगत माऊंट एव्हरेस्ट मोहिमेत काय अडचणी आल्या, हे सांगताना विद्यार्थांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तहसीलदार डॉ. क्षितीजा वाघमारे यांनी एमपीएससी परीक्षा माऊंट एव्हरेस्टच असल्याचे सांगत फक्त मांऊटवर चढताना मरण्याची भिती असते. तर एमपीएससी परीक्षेत मरण्याची भिती नसते. मात्र, दोन्हीची परिस्थिती करा किंवा मरा अशीच असल्याचे सांगितले. यावेळी उद्योजक प्रकाश कुतवळ, अनील शिंदे, किरण वागस्कर, सागर वाघमारे, राहुल कौठाळे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक अग्नीपंखचे विश्वस्त दिलीपराव काटे यांनी केले. रामदास झेंडे, नवनाथ दरेकर, प्रशांत गोरे, डी. डी. भुजबळ, गिता चौधरी, सुनील तुकाराम दरेकर, अंकुश घाडगे, मयुर गोरखे, विठोबा निंबाळकर, विश्वनाथ शेलार, भाऊसाहेब खेतमाळीस, गीता चौधरी, मधुकर काळाणे, एन टी शेलार, शुभांगी लगड, उपस्थित होते. सुत्रसंचलन राजेंद्र पोटे यांनी केले तर प्रमिला गावडे यांनी आभार मानले.