Mount Everest : वयाच्या ५०व्या वर्षी तिने सर केले माऊंट एव्हरेस्ट

Mount Everest : वयाच्या ५०व्या वर्षी तिने सर केले माऊंट एव्हरेस्ट

0
Mount Everest
Mount Everest : वयाच्या ५०व्या वर्षी तिने सर केले माऊंट एव्हरेस्ट

Mount Everest : नगर : ‘माऊंट एव्हरेस्ट’ (Mount Everest) शिखर सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहक (Mountaineer) पाहत असतो. मात्र, ते शक्य होतेच असे नाही. परंतु, महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) अकादमीतील ५० वर्षीय पोलीस निरीक्षक असलेल्या महिलेने हे स्वप्न सत्यात साकरले आहे. अशी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस दलातील त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतो आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग सर्वात अव्वल

हा विक्रम करणाऱ्या पोलीस दलातील पहिल्याच महिला

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील द्वारका विश्वनाथ डोखे यांनी धाडस केले आणि माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला. हा विक्रम करणाऱ्या त्या महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत. ध्येय गाठण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने डोखे यांना शिखर सर करता आले. द्वारका विश्वनाथ डोखे (वय -५० सध्या नाशिक येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

अवश्य वाचा : कोलकाताची तिसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या जेतेपदावर मोहोर; हैदराबादला नमवले

दोन वर्ष केली तयारी (Mount Everest)

काही वर्षांपूर्वी त्यांच्या वाचनात “साद देती हिम शिखरे” हे पुस्तक आले. त्यानंतर त्यांना बर्फाच्छादित डोंगर सर करण्याचे आकर्षण वाटू लागले. त्यांनी अनेक छोटे डोंगर सर केले. मात्र, सर्वोच्च हिम शिखर असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच्या ध्येयाने त्यांना पछाडले. मग त्यांनी त्यासाठी मेहनत केली. सराव केला. दोन वर्ष तयारी केल्यानंतर ३० मार्च २०२४ ला माऊंट एव्हरेस्ट चढायला सुरुवात केली आणि २२ मे ला म्हणजेच साधारण ५० दिवसांच्या प्रयत्नात त्या माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहचल्या. श्रीरामपूर शहरात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here