Movement : वर्षश्राद्ध आंदोलन तात्पुरते स्थगित 

Movement : राहुरी : नगर-मनमाड रस्ता (Nagar-Manmad road) दुरुस्त व्हावा, म्हणून नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने ३ डिसेंबर रोजी शासकीय अधिकाऱ्यांचे वर्षश्राद्ध आंदोलन (Movement) करण्याचे पत्र दिले होते.

0
Movement : वर्षश्राद्ध आंदोलन तात्पुरते स्थगित 
Movement : वर्षश्राद्ध आंदोलन तात्पुरते स्थगित 

Movement : राहुरी : नगर-मनमाड रस्ता (Nagar-Manmad road) दुरुस्त व्हावा, म्हणून नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने ३ डिसेंबर रोजी शासकीय अधिकाऱ्यांचे वर्षश्राद्ध आंदोलन (Movement) करण्याचे पत्र दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तसेच खासदार सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande) यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. 

हेही वाचा : सावधान; नगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

सदर आंदोलनाची दखल घेत शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत देवळाली प्रवरा नगरपालिकेत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकारी, रस्ता वाहतूक नियंत्रक अधिकारी, पोलीस निरीक्षक, ठेकेदार कंपनी व रस्ता दुरुस्ती समितीचे सदस्य यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सदस्य देवेंद्र लांबे यांनी प्रवाशांच्या वतीने भूमिका मांडतांना सांगितले की, नगर ते शिर्डी पर्यंत रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून गेल्या २०१९ पासून विविध आंदोलने करण्यात आली आहेत.

नक्की वाचा : नगरच्या कार्तिक नन्नवरेला तीन सुवर्णपदके

आतापर्यंत राहुरी परिसरातच जवळ जवळ ४५ प्रवाशांचा अपघातात मृत्यू झालेले आहेत तर अनेक प्रवाशांचा रस्ता अपघातात अपंगत्व आले आहे. या कुटुंबातील सदस्यांचे कमवत्या सदस्यांचे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आलेल्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत चांगलेच धारेवर धरले. निधी उपलब्ध होवून देखील तुमच्याकडून काम होत नसेल तर आपल्या विरोधात केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली जाईल. रस्ता अपघाताचा प्रश्न गंभीर झालेला आहे. मी स्वतः याच रस्त्यावरून प्रवास करतो वस्तुस्थिती समोर आहे. रस्त्याला सरकारकडून निधी उपलब्ध होवून देखील ठेकेदार वेळेत रस्त्याची कामे करत नसतील तर त्यांच्यवर कारवाई करण्याचे अधिकार तुमच्याकडे आहेत असे अधिकाऱ्यांना सुनावले. जनतेचा लोकप्रतिनिधी या नात्याने सरकार दरबारी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे कृती समितीची मागणी तत्काळ मान्य करावी, असे खासदार लोखंडे म्हणाले.

खासदार लोखंडे व कृती समितीच्या सदस्यांना उत्तर देतांना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अनिल गोरड यांनी सांगितले की, रस्ता दुरुस्तीचे काम करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती. संबधित ठेकेदाराला काम चालू करण्याविषयी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. परंतु आंदोलकांच्या मागणीचा विचारात घेता प्रथम प्राधान्य म्हणून विळद घाट ते सावळीविहीर पर्यंत ज्या ठिकाणी एकेरी वाहतूक आहे, त्या ठिकाणी तत्काळ दुहेरी वाहतूक चालू करण्यासाठी काम चालू केले जाईल. त्यात प्रथम प्राधान्य म्हणून जोगेश्वरी आखाडा सूतगिरण समोर, राहुरी येथील रस्त्याचे काम तात्काळ चालू करून १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अनिल गोरड यांनी दिलेल्या आश्वासनावर कृती समितीच्या सदस्यांनी सहमती न दाखवल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी हस्तक्षेप करत रस्ता दुरुस्ती कामासाठी खूप वर्ष वाट पहिली आहे, त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्यासाठी काही वेळ ठेकेदारला द्यावा, असे मत मांडत १० डिसेंबर पर्यंत मुदत देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. सदरील विषयावर रस्ता दुरुस्ती कृती समितीचे वसंत कदम यांनी ३ डिसेंबर रोजी होणारे वर्षश्राद्ध आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे सांगत १० डिसेंबर २०२३ पर्यंत जोगेश्वरी आखाडा परिसरातील दुहेरी रस्त्याचे काम न झाल्यास सर्व अधिकाऱ्यांचे वर्षश्राद्धाचे फोटो असलेले फ्लेक्स बोर्ड नगर ते शिर्डी पर्यंत लावून १५ डिसेंबर २०२३ रोजी अधिकाऱ्यांचे वर्षश्राद्ध आंदोलन करण्यात येईल असे वसंत कदम म्हणाले. याप्रसंगी चर्चेत शिवाजी कपाळे, गणेश भांड, संपत जाधव आदींनी चर्चेत सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here