Movement : वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Movement : वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

0
Movement : वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
Movement : वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Movement : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील सिंगल फेज वीजपुरवठा (Power Supply) तात्काळ पूर्ववत सुरू करून सरकारी नियमानुसार किमान आठ तास वीज मिळावी, या मागणीसाठी शिव प्रहार संघटनेच्या (Shiv Prahar Organization) वतीने विद्युत महावितरणच्या (Mahavitaran) अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले.

नक्की वाचा : राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स’ने घेतलेला सद्यस्थितीचा आढावा

रात्रीच्या वेळी वीजपुरवठा अत्यंत आवश्यक

यावेळी शिव प्रहार संघटनेचे युवक तालुकाप्रमुख गोरक्षनाथ आढाव यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत गोसावी, करण भोंदे, रामदास झिने, जनार्दन झिने, मच्छिंद्र झिने, शिवाजी लहारे, आदिनाथ गुंड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. पिंपळगाव माळवी येथे महावितरणकडून सिंगल फेज वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या परिसरात बिबट्याच्या हालचालीमुळे रात्रीच्या वेळी वीजपुरवठा अत्यंत आवश्यक आहे. तरीही केवळ पाच तासच वीजपुरवठा दिला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तांत्रिक बिघाड तत्काळ दुरुस्त करावा (Movement)

तसेच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तांत्रिक बिघाड तत्काळ दुरुस्त करावा व संबंधित जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, तीन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास शिव प्रहार संघटना व ग्रामस्थांच्या वतीने २३ मार्चपासून महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.