Movement : जमीन वाटपात कुणीही राजकारण केले तर बदडून काढू; काळे यांचा इशारा

Movement : जमीन वाटपात कुणीही राजकारण केले तर बदडून काढू; काळे यांचा इशारा

0
Movement : जमीन वाटपात कुणीही राजकारण केले तर बदडून काढू; काळे यांचा इशारा
Movement : जमीन वाटपात कुणीही राजकारण केले तर बदडून काढू; काळे यांचा इशारा

Movement : श्रीरामपूर : आम्ही शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने आंदोलन (Movement) करणार आहोत. आमच्या वाडवडिलांच्या हक्काच्या जमिनी संदर्भात स्थानिक आमदार, खासदार, मंत्री कुणीही मदत केली तर त्यांना आम्ही आकारी पडीत शेतकरी (Farmers) डोक्यावर घेऊ. मात्र, या जमीन वाटप संदर्भात कुणीही राजकारण केले तर त्यांना बदडून काढू असा इशारा आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. अजित काळे (Ajit Kale) यांनी दिला.

नक्की वाचा : ढवळपुरी परिसराला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेली पिके मातीमोल, शेतकरी हवालदिल

जमिनी वाटपासंदर्भात निर्णय घेण्याचे  निर्देश

शासन जमिनीचे मालक कधीच झालेले नसून शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केलेल्या नाहीत, असे आशयाचे पत्र शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात सादर केल्यानेच संभाजीनगर उच्च न्यायालयाने आठ आठवड्यांत जमिनी वाटपासंदर्भात निर्णय घेण्याचे  निर्देश (ता. १४) ऑगस्ट २०२४ ला राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर, सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देऊनही सरकार मुळ वारसांना जमीन वाटप करण्याचा निर्णय घेत नसल्याने आज आम्हाला आत्मक्लेश आंदोलन करावे लागले. या आंदोलनाची दखल १५ दिवसात सरकारने घेतली नाही तर जेलभरो आंदोलन आणि त्यानंतर जमिनीवर कब्जा आंदोलन करण्याचा ईशाराही आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. अजित काळे यांनी दिला.ते शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोरील आयोजित आत्मक्लेश आंदोलकासमोर मार्गदर्शन करताना बोलत होते.

अवश्य वाचा : कंट्रोल रूम आणि सीसीटीव्ही यंत्रणेसाठी निधी मंजूर; तांबे यांच्या प्रयत्नांना यश

शासनस्तरावर कुठलीही हालचाल नाही (Movement)

शेती महामंडळाच्या हरिगाव मळा पंचक्रोशीतील शिरसगाव, वडाळा महादेव,ब्राम्हणगाव, ऊंदिरगाव,खैरी निमगाव, खानापूर,माळवाडगाव,मुठेवाडगाव या ९ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांचे जमिनी संदर्भात अनेक दशकांपासून आंदोलन सुरू असून शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अँड अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखालील आंदोलन अंतिम अन् निर्णायक टप्प्यावर आलेले आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आठ आठवड्यांत म्हणजे ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले असतानाही शासनस्तरावर कुठलीही हालचाल झालेली नाही. उलट शासनाने ४ हजार एकर जमीन उद्योगास देण्यासाठी हालचाली सुरू केल्याने हे आंदोलन अधिकच तीव्र झाल्याने शुक्रवार (ता. २०)  मार्चला महात्मा गांधी पुतळ्यासमोर ॲड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महिला पुरुष शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अजित काळे म्हणाले की

या प्रसंगी ॲड. अजित काळे पुढे म्हणाले की या आकारी पडीक जमिनी वाटपा संदर्भात ईतिहास पार्श्वभूमी सर्वांना माहित आहे. या संदर्भात शासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे. परंतू आपण अशीच खंबीर साथ दिली तर यशोशिखर दूर नाही. सध्या ४ हजार एकर झेड आर टू कंपनीला देण्याचा मुद्दा अधिवेशनात खुप गाजतो आहे.  मात्र या अधिवेशनात विरोधी पक्षाचे वडेट्टीवार यांनी ४ हजार एकर जमीन व त्या जमिनींचे व्हॅल्यूवेशन सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र या जमिनी गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांच्या आहेत याबद्दल चकार शब्दही उच्चारला नाही,असेही शेवटी काळे म्हणाले. आत्मक्लेश आंदोलनात महात्मा गांधी यांची प्रतिकात्मक वेशभूषा खानापूर येथील उत्तम शिंदे ( गोसावी) तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा टाकळीभानचे कार्लस साठे यांनी हातात संविधान प्रत घेऊन वठवली.

तरूण मोठ्या संख्येने सहभागी

दुपारी दोन नंतर राजकारण विरहित फक्त आकारी पडीत या विषयावर प्रथम प्रकाश चित्ते, सुरेश ताके, शालनबाई झुराळे, गंगाधर चौधरी, सचिन वेताळ,  शरद  आसने, दत्तात्रय मुठे, रूपेश काळे यांच्या मनोगतानंतर जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. तहसिलदार मिलिंद वाघ, शहर पोलीस निरीक्षक देशमुख यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले. या मोर्चास शेतकरी संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्यासह महिला, पुरुष, तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.