Movement : पाथर्डी : तालुका वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने राज्यभरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या निषेधार्थ तसेच गॅस कमतरतेमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असलेल्या परिणामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नरेंदर कब मिलेगा गॅस सिलेंडर? या घोषणेसह तीव्र आंदोलन (Movement) छेडण्यात आले. तालुका अध्यक्ष श्रीकांत बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तहसील कार्यालयासमोर (Tehsil Office) कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चूल पेटवून आणि रिकामा गॅस सिलेंडर ठेवून प्रतीकात्मक पद्धतीने संताप व्यक्त केला.
अवश्य वाचा: मोबाईल व घरातील दागिने घेऊन नवरी पसार; पाथर्डी तालुक्यातील घटना
गॅस टंचाई दूर करण्याची मागणी
या आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार किशोर सानप यांना निवेदन देऊन गॅस टंचाई तत्काळ दूर करण्याची मागणी करण्यात आली. श्रीकांत बोर्डे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून हे धरणे आंदोलन करण्यात येत असून गॅस टंचाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे; त्यामुळे शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच हे आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांची उपस्थिती (Movement)
याप्रसंगी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष श्रीकांत बोर्डे, युवक तालुकाध्यक्ष आकाश शिंदे, महिला अध्यक्षा रोहिणी ठोंबे, लहू शिंदे, मार्कस शिंदे, सुभाष शिंदे, आजिनाथ साळवे, विजय साळवे, अमोल जाधव, बाळासाहेब पंडागळे, दादू वाघमारे, तानाजी वाघमारे, कैलास वाघमारे, सचिन वाघमारे, गहिनीनाथ नाकाडे, दत्तात्रय सातपुते, अनिल बोर्डे , सुभाष पठारे, राजेंद्र बळीत, भीमराज शिंदे , प्रमोद तिजोरी, महेश राऊत, अमोल जाधव, मीना शिंदे , कमल शिंदे , सिंधुबाई ठोंबे, अनिल शिंदे, आनंद उबाळे आदी उपस्थित होते.



