Movement : पारनेर : लोकशाही (Democracy) व संविधान बचाव अभियानांतर्गत पारनेरमधे ईव्हीएम (EVM) हटाव, या मागणीसाठी संविधानाचा (Constitution) जागरण गोंधळ हे जन आंदोलन (Movement) पुकारण्यात आले होते. मुख्य प्रवर्तक राजेंद्र करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
हे देखील वाचा: आजपासून निवडणूक आयोगाचं नाव धोंड्या; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध
ईव्हीएम मशीनला देशातून हद्दपार करण्यासाठी आणि शिक्षणाचे खासगीकरण करणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध करण्यासाठी, सरकारी अधिकारी व कर्मचारी यांची खासगी कंपनीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी, जीवनावश्यक वस्तुंवरील जाचक कर वसुली आणि त्यामुळे निर्माण झालेली प्रचंड महागाई रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळविण्यासाठी तथा इतर अनेक जनहितार्थ मागण्यांसाठी लोकशाही व संविधान बचाव अभियानाद्वारे क्रमबद्ध तीव्र जनआंदोलन सुरु करण्यात आले आहे.
नक्की वाचा: नटसम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
आंदोलनात सहभाग (Movement)
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब पातारे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर, एकलव्य फाऊंडेशनचे बाळासाहेब माळी, महात्मा फुले समता परिषदेचे सुभाष लोंढे, भारत मुक्ती मोर्चाचे रविंद्र साळवे, राष्ट्रीय समाज पक्षाचे सतिश गोगडे, हसन राजे, अविनाश देशमुख, प्रदीप मोरे, योगेश सोनवणे, सुदाम कोरडे, मनोज सुर्यवंशी, वसंत कसबे, प्रदीप काळे, किरण सोनवणे, अमोल ठुबे, गनीभाई इनामदार, सतीश सूर्यवंशी, बाळासाहेब शिरतार, शाहीर दत्ता जाधव, हिरामण सोनवणे, प्रदीप नगरे, रामहरी भोसले, मेजर संतोष तडके, सुभाष जेकटे, फिरोजभाई शेख, संतोष केदारी,नंदु साळवे, मेजर शिवाजी सरोदे, श्रावण गायकवाड, बाळशिराम सोनवणे, आण्णा खैरे, अशोक जाधव, महेश उमाप, सुधीर खरात, सुनील इधाटे, गिरीश गायकवाड, रफिक राजे आदी मान्यवर उपस्थित होते.