Movement : राहुरी : येत्या बुधवारी नगर-मनमाड रस्ता (Nagar-Manmad Road) कृती समिती रास्ता रोको आंदोलनाची तयारी करीत असतानाच आज अचानक माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी राहुरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी संतप्त नागरिकांनी दशक्रिया विधी आंदोलन (Movement) केले.
नक्की वाचा: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीपणे राबवा
आठवड्याभरामध्ये 3 जणांनी गमावला जीव
गेल्या आठवड्याभरामध्ये पाच किलोमीटरच्या अंतरात चार अपघात होऊन तीन जणांना आपला जीव गमावले लागले आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तरी देखील प्रशासनाला जाग आलेली नाही. प्रशासनाने वाहनधारक व चालकावरच गुन्हा दाखल न करता ठेकेदार व अधिकाऱ्यावर देखील गुन्हा दाखल करावा. अन्यथा येत्या सात दिवसांमध्ये हजारोच्या संख्येने नगर मनमाड रोडवर रास्ता रोको करण्यात येईल. मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर परंतु मी मागे हटणार नाही, असा इशारा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
नगर मनमाड रोडची झालेली दुर्दशा पाहता तसेच आजपर्यंत हजारो जणांना आपला जीव गमावल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता.८) सकाळी राहुरी तहसील येथे दशक्रिया विधी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करत प्रतीकात्मक मुंडन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी स्वीकारले..
अवश्य वाचा : रविशंकर विद्यालयाने पारंपरिक पद्धतीने दिला गणरायाला निरोप
यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले, (Movement)
नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्या रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताची संख्या दिवसागणित वाढत चालली आहे. यामध्ये आत्तापर्यंत हजारो जणांना आपला जीव गमावा लागला आहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. ठेकेदाराने अत्यंत निष्काळजीपणाने रस्त्याचे काम केले आहे. यामुळे जनतेच्या पैशाची मोठी नासाडी झाली आहे. आणि या लोकांच्या मृत्यूला ठेकेदार व अधिकारीच कारणीभूत आहे.
खासदार निलेश लंके यांनी दोनदा या रस्त्यासाठी उपोषण केले व आता मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून मेन रस्त्याच्या कामाला वर्कआउट मिळाली असून लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. ते काम देखील चांगले व्हावे, याची काळजी ठेकेदारांनी घ्यावी. आत्तापर्यंत हजारो जणांना आपला नाहक बळी गमावावे लागले आहेत. त्यामुळे या अपघातात जबाबदार असणारे ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कामात कसूर केल्याबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी. जर गुन्हा दाखल होऊन अधिकारी बडतर्फ झाले नाही तर पुढील सात दिवसांमध्ये हजारोच्या संख्येने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. मग यामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर तरी मागे हटणार नाही.
यावेळी तनपुरे, बाबासाहेब भिटे, सागर तनपुरे, राजेंद्र बोरकर, अनिल कासार, दत्तात्रय येवले, शिवाजी वाराळे अमोल तनपुरे, रवींद्र आढाव, ज्ञानेश्वर जगधने, सोन्याबापू, जगधने, प्रभाकर गाडे, बाळासाहेब आढाव, सचिन भिंगारदे, निलेश जगधने, विजय तमनर, मुकेश जगधने, महेश उदावंत, नंदकुमार तनपुरे, अँड. राहुल शेटे, बाळासाहेब उंडे, रफिक शेख, राजू आढगळे, राम तोडमल, ज्ञानेश्वर बाचकर, बाळासाहेब जाधव, सुर्यकांत वाघचौरे, शाहजी जाधव, दत्तात्रय जोगदंड, संदीप सोनवणे, प्रदिप पवार, दत्तात्रय कवाने, मधुकर घाडगे, दिलीप गोसावी, सौरभ उंडे, अशोक कदम, गणेश धाडगे, ज्ञानेश्वर राक्षे, वसंत जगधने, सोहम जगधने, कांतीलाल जगधने, धनंजय म्हसे, संतोष आघाव, साईनाथ जगधने,नंदू वैरागर, सूर्यकांत वाघचौरे, सचिन तनपुरे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.