MP Nilesh Lanke : नगर : अहिल्यानगर–पुणे महामार्ग (Ahilyanagar-Pune Highway) हा जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग ठरत आहे. या मार्गावरील म्हसणे फाटा परिसर गंभीर वाहतूक समस्येचा केंद्रबिंदू बनला आहे. दररोज हजारो वाहनांची वर्दळ, नियंत्रणाची कमतरता आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (Public Works Department) वाहतूक सिग्नल बसविण्याची मागणी केली आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
सिग्नल नसल्यामुळे वाहतुकीचे नियंत्रण कोलमडले
अहिल्यानगर–पुणे हा केवळ जिल्ह्याचाच नव्हे तर राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर म्हसणे फाटा हे ठिकाण शहर व ग्रामीण भागाला जोडणारे प्रमुख चौक आहे. दररोज सकाळ–संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी येथे वाहनांची संख्या काही हजारांच्या घरात असते. मात्र, सिग्नल व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीचे नियंत्रण पूर्णतः कोलमडले आहे. अनेकदा चार दिशांतून वाहने एकाच वेळी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याने वाहतुकीची कोंडी, आणि अपघातांची शक्यता वाढली आहे.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
पादचारी अपघातांच्या घटना वाढण्याची शक्यता (MP Nilesh Lanke)
या चौकातून अनेक शाळा आणि महाविद्यालयांकडे जाणारी वाहतूक होते. त्यामुळे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण झाला आहे. वाहनांच्या वेगामुळे आणि सिग्नल नसल्याने पादचारी अपघातांच्या घटना वाढण्याची शक्यता वाढली आहे. “नागरिकांना सुरक्षितता देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सिग्नल त्वरित बसवावे अशी मागणी, खासदार लंके यांनी केली आहे.



