MP Nilesh Lanke : नगर : जोपर्यंत मी एखादे ठोस सामाजिक कार्य पूर्ण करत नाही, तोपर्यंत कोणताही सन्मान स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी व्यक्त केली. सोशल पारनेर सामाजिक संस्था व कृषी व जनसेवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात आलेल्या स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट स्मृती पुरस्कारांचे वितरण खासदार लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे (Senior Writer Sahebrao Thange) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ.विद्या कवरे (Dr. Vidya Kavere), उपनगराध्यक्षा सुप्रिया शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
अवश्य वाचा : श्रीगोंद्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ट्रॅक्टर पलटी होऊन दोन चिमुकले जागीच ठार
यांना स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट स्मृती पुरस्काराने गौरवले
डॉ.रफीक सय्यद (आरोग्य व अध्यात्मिक कार्य), पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर (शिक्षण, संस्कृती व पर्यावरण), पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे (पत्रकारिता, लेखन व सामाजिक चळवळ), पत्रकार देवीदास आबूज (पत्रकारिता व साहित्य), प्रसाद तारे (शिवचरित्रकार), प्रकाश गाजरे (आदर्श गाव), मार्तंड बुचूडे (पत्रकारिता), अलका कदम (महिला सक्षमीकरण), गणपत वाफारे (समाजसेवा), राजेंद्र देशपांडे (समाजसेवा),अनिल भंडारी (समाजसेवा) यांना यांना स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले.
शिक्षक नेते रा.या.औटी, ज्येष्ठ विधीज्ञ पी.आर.कावरे, मारूती शेरकर, सोशल पारनेरचे अर्जून भालेकर, कृषी व जनविकास प्रतिष्ठानचे अरूण आंधळे, नंदकुमार दरेकर, विठ्ठल औटी, दिलीप भालेकर, संजय देशमुख, सुधाकर दरेकर, गौरव भालेकर, बिंदूराज भालेकर वसिम राजे, साहिल शेख आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर गुन्हा दाखल; महाराजांचा अवमान केल्याचा आरोप
खासदार लंके म्हणाले, (MP Nilesh Lanke)
सेनापती बापटांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या जन्मस्थळावर त्यांना अभिवादन करणे म्हणजे क्रांतींची, समाजसेवेची प्रेरणा, उर्जा घेण्यासारखे आहे. सेनापतींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत सोशल पारनेर, कृषी व जनविकास प्रतिष्ठानने पारनेर तालुक्यातील विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला ही पारनेरकरांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे म्हणाले, आपापल्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला पुरस्कार मिळाला किंवा पाठीवर थाप पडली तरी ती खूप महत्वाची असते. त्यामुळे आणखी जोमाने काम करण्यास ऊर्जा मिळते. अर्जून भालेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा.अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन तर अरूण आंधळे यांनी आभार मानले.



