MPDA : नगर : अहिल्यानगर शहरात घातक शस्त्र व गावठी कट्टे (Illegal Weapon) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए (MPDA) कायद्यान्वे एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याबाबतची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी (Collector) यांनी आदेश पारित केले आहेत.
अवश्य वाचा : सभापती राम शिंदेंचा रोहित पवारांना सहावा धक्का; जामखेड बाजार समितीच्या उपसभापतींवर अविश्वास प्रस्ताव
गंभीर स्वरुपाचे ११ गुन्हे दाखल
भावेश अशोक राऊत (वय ३२, रा. माणिक चौक, अहिल्यानगर) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे. बंटी उर्फ भावेश राऊत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात दरोडा टाकणे, घरात घुसुन महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, बलात्कार करणे, तसेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करणे, गावठी कट्टा वापरणे असे गंभीर स्वरुपाचे ११ गुन्हे दाखल आहेत.
नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे’;अनिल बोंडेंची टीका
आरोपी नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द (MPDA)
सराईत गुन्हेगार बंटी राऊत याचे समाज विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये प्रस्ताव तयार करुन पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे सादर केला. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पडताळणी करुन अहिल्यानगर जिल्ह्यातील सार्वजनीक सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता सराईत गुन्हेगार बंटी राऊत याला स्थानबध्द करणे बाबतचे आदेश काढले असून त्याला ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस रवींद्र घुंगासे, विशाल तनपुरे, रमिझ आतार, महादेव भांड, कोतवाली पोलीस ठाण्याच्या शिल्पा कांबळे, राहुल मासाळकर यांच्या पथकाने केली.