MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचे निधन

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचे निधन

0
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचे निधन
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचे निधन

MPKV : राहुरी : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू (Vice Chancellor) डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील (वय ५६)यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन (Death) झाले. पुणे येथील रुग्णालयात त्यांच्या वर उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, वडील असा परिवार आहे. त्यांचे असे अचानक जाण्यामुळे कृषी विद्यापीठामध्ये (MPKV) शोकाकूल वातावरण आहे.

नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पुन्हा लांबणीवर

कृषी क्षेत्रातील संशोधन सेवेचा ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा पदभार सांभाळण्यापूर्वी त्यांनी मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (सिर्कोट) संचालक पदाची व तंत्रज्ञान हस्तांकरण प्रमुख ही महत्वाची पदे भुषवली होती. काही काळ त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथील प्रभारी कुलगुरू या पदाचा देखील कारभार सांभाळला होता. कृषी क्षेत्रातील संशोधन व विस्तार उपक्रमातील सेवेचा त्यांना ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. ४ पुस्तके, १९९ संशोधनात्मक पेपर, तांत्रिक शिक्षणासंबंधीची १४ पुस्तके व १ पेटंन्ट त्यांच्या नावावर जमा आहे. 

अवश्य वाचा : ‘ती’ च्या अवयवदानातून तिघांना ‘पुनर्जन्म’

कर्मचारी, अधिकारी व शेतकऱ्यांच्या हिताचे बरेचसे निर्णय (MPKV)

राहुरी कृषी विद्यापीठांमध्ये कुलगुरु पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी सुयोग्य निर्णय घेऊन विद्यापीठाला शिक्षण, संशोधन व विस्तारत विद्यापीठाला नावलौकिक मिळवून दिले. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे विद्यापीठाला नुकताच उत्कृष्ट ‘ए’ ग्रेड मानांकन प्राप्त झाले आहे. कर्मचारी, अधिकारी व शेतकऱ्यांच्या हिताचे बरेचसे निर्णय त्यांनी घेतले. यामध्ये विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकरिता कारकीर्द प्रगती योजना, १२/२४ आश्वासित प्रगती योजना, कर्मचाऱ्यांच्या सोयीस्कर पदस्थापना, अनुकंप भरती, सेवानिवृत्त लाभ व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन, विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांची जाहिरात त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठामध्ये नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आले. कार्यतत्पर शैली, पारदर्शकता व योग्य निर्णयासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांच्या या अचानक निधनामुळे विद्यापीठामध्ये शोकाकुल वातावरण झाले आहे. 


त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज सकाळी पुणे येथील शिवाजीनगरच्या जुनी शताब्दी इमारत,कॉलेज ऑफ एग्रीकल्चर येथे ठेवले जाणार आहे. अंत्यविधी मूळ गावी कवठे एकंद (ता. तासगाव. जि सांगली) येथे आज दुपारी २ :३० वाजता होणार आहे.