MPSC : राहुरी : डिग्रस येथील सुप्रिया शिवाजी गावडे हीची लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत सहायक गटविकास अधिकारी (Assistant Block Development Officer) म्हणून निवड झाल्याने व शिवाजी किसन गावडे यांची वीज मंडळातून सेवापूर्ती झाल्याने येथील आप्त, ग्रामस्थ आणि मित्र मंडळाकडून सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले (Akshay Kardile) होते.
नक्की वाचा : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कष्टाची तयारी ठेवल्यास त्यातून निश्चित प्रगती होते
यावेळी अक्षय कर्डीले म्हणाले की, वडिलांचे संस्कार आणि जीवनात मेहनत करून केलेला संघर्ष यामुळे जीवन खऱ्या अर्थाने आदर्श बनते त्यासाठी जीवनात संघर्ष आणि त्यागाची, कष्टाची तयारी ठेवल्यास त्यातून निश्चित प्रगती होते .असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक व युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले. आजचा दिवस गावडे कुटुंबासाठी सुवर्ण दिवस आहे. करिअर घडविताना सुप्रिया हिने स्वतःला अभ्यासात झोकून दिल्याने आजचा हा सुवर्ण दिवस कुटुंबाला पाहायला मिळला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि कष्ट महत्वाचे (MPSC)
सुप्रिया गावडे हिने आतापर्यंत कक्षाधिकारी, विक्रीकर निरीक्षक, सहायक गटविकास अधिकारी, आणि दुय्यम निबंधक वर्ग १ या पदावर उत्तीर्ण झाली आहे.यावेळी कार्यक्रमात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही हजेरी लावली. जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि कष्ट महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. तनपुरे यांनी सुप्रिया गावडे हिला शुभेच्छा देऊन शिवाजी गावडे यांनी वीज मंडळात केलेल्या कामाची स्तुती करून त्यांनाही भावी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान केला.
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
या कार्यक्रमात मनोहर महाराज भोगे यांनीही बाप लेकीचा सत्कार करून त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महावितरण तालुका अधिकारी धीरज गायकवाड, सह.अभियंता नितीन मुरकुटे, शिंदे, वैभव गावडे, बाबासाहेब दातीर, दत्ता मिसाळ, तसेच इतर ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



