MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय;‘पीएसआय’ पदाची शारीरिक चाचणी लांबणीवर

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा- २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

0
MPSC
MPSC

नगर : पोलीस उपनिरीक्षक (PSI) होणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा- २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha Elections) ही शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने (एमपीएससी) घेतला आहे. आयोगाने या संदर्भात प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

नक्की वाचा : गिल सेनेने मैदान मारले;राशीद खान ठरला गेमचेंजर  

लोकसभा निवडणूकीमळे शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय (MPSC)

राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत होणाऱ्या शारीरिक चाचणीसाठी पोलीस अधिकारी, तसेच इतर मनुष्यबळ पुरवणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी एमपीएससीला कळवले आहे. या पार्श्वभूमीवर या कालावधीतील नियोजित शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम एमपीएससीच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

अवश्य वाचा : नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात;उभ्या गाडीला भरधाव ट्रकची धडक

उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार (MPSC)

राज्यातील हजारो उमेदवार पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी धडपड करत असतात. २०२१च्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या भरती परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तीन वर्षांनी जाहीर करण्यात आली आहे. तर आता २०२२ च्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षेच्या उमेदवारांनाही आता प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here