
MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ च्या (MPSC 2024 Results) अंतिम निकाल काल (ता.८) जाहीर झाला. या निकालात सोलापूर जिल्ह्याचा दबदबा पाहायला मिळाला आहे. सात पैकी एकाच जिल्ह्यातून चार उपजिल्हाधिकारी होण्याचा मान सोलापूरच्या (Solapur) पोरांनी पटकावला आहे. राज्यातील उपजिल्हाधिकारी पदाच्या (Post of Deputy Collector) सात जागांपैकी तब्बल चार जागांवर सोलापूरच्या सुपुत्रांनी नाव कोरले आहे.
नक्की वाचा: ‘बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा सल्ला मी काँग्रेसला देईन,पण…’; शरद पवारांचं सूचक वक्तव्य
सोलापूरच्या विजय लामकाने यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा रोवला आहे. या सोबतच मुलींमध्ये आरती जाधव हिनेही अव्वल येत सोलापूरचा झेंडा उंचावला आहे. पवन मंगरूळे आणि अमित लोकरे यांनीही उपजिल्हाधिकारी पद मिळवत जिल्ह्याच्या यशात भर घातली आहे. एकाच जिल्ह्यातून चार उपजिल्हाधिकारी सोलापूरचे असून राज्याच्या टॉपर लिस्टमध्ये सोलापूरची दमदार एंट्री झाली आहे. या निकालानंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात असून जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना आहे. स्पर्धा परीक्षेत प्रयत्न करणाऱ्या मुलांचे मनोबल यामुळे उंचावले जाणार आहे.
अवश्य वाचा: एसटी महामंडळाचा प्रवाशांना दणका;तिकीट दरात मोठी वाढ
कट-ऑफ मुळे उमेदवारांमध्ये चर्चेचा विषय (MPSC Result)
राज्यसेवा मुख्य परीक्षा एमपीएससीतर्फे २७ ते २९ मे २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या १,५१६ उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया ३० ऑक्टोबरपर्यंत पार पडली. त्यानंतर आयोगाने रात्री उशिरा निकाल जाहीर केला. एकूण ७,९७० उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ७,७३२ उमेदवारांनीच मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर केला. विविध तांत्रिक कारणांमुळे काही उमेदवारांना अर्ज सादर करण्यात अडचणी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने अर्ज प्रणाली खुली ठेवत पात्र उमेदवारांना संधी दिली होती.
यंदाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा कट-ऑफ इतिहासातील सर्वाधिक राहिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. या परीक्षेत सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गासाठी कट-ऑफ ५०७.५० गुणांवर, अनुसूचित जातीसाठी ४४७ गुणांवर, तर अनुसूचित जमातीसाठी ४१५ गुणांवर गेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या उच्च कट-ऑफमुळे आश्चर्य व्यक्त करत स्पर्धा अधिक तीव्र झाली अशी प्रतिक्रिया दिली होती.
विजय लामकाने कोण? (MPSC Result)
राज्यात पहिला क्रमांक पटकावणारे विजय नागनाथ लामकाने हे यापूर्वीही एमपीएससीच्या माध्यमातून विविध सेवांमध्ये निवड झालेले आहेत. सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासामुळे त्यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.नागपूरची प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.


