MSP Procurement : नगर जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी; शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

MSP Procurement : नगर जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी; शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

0
MSP Procurement
MSP Procurement

MSP Procurement : नगर : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने (Marketing Federation) मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी दिली आहे. हंगाम २०२४-२५ मूग, उडीद व सोयाबीन हमीभावाने खरेदीच्या (MSP Procurement) तारखा निश्चित करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी बी.आर. पाटील यांनी दिली आहे.

नक्की वाचा: शिर्डी विमानतळाच्या नवीन इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

१२ केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

मूग या पिकासाठी हमीभाव ८ हजार ६८२ प्रतिक्विंटल, उडीद ७ हजार ४०० प्रतिक्विंटल तर सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. मूग व उडीद पिकाची १० ऑक्टोबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५, तर सोयाबीन पिकाची १५ ऑक्टोबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत केंद्रावरुन खरेदी करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १८ केंद्रापैकी खालील १२ केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे..

अवश्य वाचा: नगर जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर

खरेदी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार (MSP Procurement)

शेवगाव तालुक्यामध्ये सुखायू फार्मर प्रोड्युसर कंपनी, बोधेगाव व नाथ ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, हातगाव, पाथर्डी तालुक्यात जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था, मार्केट यार्ड पाथर्डी, जामखेड तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड, जामखेड, कर्जत तालुक्यात कर्जतकर फार्मर प्रोड्युसर कंपनी, बर्गेवाडीरोड, कर्जत, श्रीगोंदे तालुक्यात शिवदत्त फार्मर प्रोड्युसर कंपनी, घारगाव, रिअल ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, घुटेवाडी, जय किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी, मांडवगण, राहुरी तालुक्यात राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, राहुरी, पारनेर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड, पारनेर, राहाता तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड, राहाता, तर कोपरगाव तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड, कोपरगाव येथे खरेदी करण्यात येईल. सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.