Muddy Water : शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा; उपाययाेजना करा, अन्यथा मुक्काम ठाेकाे आंदाेलनाचा काकडेंचा इशारा

Muddy Water : शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा; उपाययाेजना करा, अन्यथा मुक्काम ठाेकाे आंदाेलनाचा काकडेंचा इशारा

0
Muddy Water
Muddy Water : शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा; उपाययाेजना करा, अन्यथा मुक्काम ठाेकाे आंदाेलनाचा काकडेंचा इशारा

Muddy Water : नगर : शेवगाव शहरात दुर्गंधीयुक्त गढूळ पाण्याचा (Muddy Water) पुरवठा हाेत असून नागरिकांच्या आराेग्याला धाेका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे (Harshada Kakade) यांनी केली आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांना दिले. यावेळी जनशक्तीचे युवानेते पृथ्वीसिंह काकडे, राजेंद्र फलके, सुनील आव्हाड, तुकाराम विघ्ने आदी उपस्थित होते.

Muddy Water
Muddy Water : शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा; उपाययाेजना करा, अन्यथा मुक्काम ठाेकाे आंदाेलनाचा काकडेंचा इशारा

नक्की वाचा : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला, शासकीय वाहनही फोडले

निवेदनात म्हटले आहे की (Muddy Water)

”शेवगाव शहरातील वाढीव पाणीपुरवठ्याचे काम तत्काळ सुरू करावे, तसेच नियमित पाणीपुरवठा करून रस्ते, सांडपाणी व विद्युतीकरण त्वरित करावे. सध्या शेवगाव शहरातील नागरिक दुर्गंधीयुक्त मैला मिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा हाेत आहे. 

हेही पहा : निवडणूक आयोगाने ईव्हीएम मध्ये घोटाळा केला; तर मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही : माजी मंत्री सुबोध सावजी

यावेळी हर्षदा काकडे म्हणाल्या (Muddy Water)

”महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शेवगाव शहराला वाढीव पाणीपुरवठा योजनेचे नियोजन २०१७ ला मंजुरी मिळाली. त्यानुसार त्याचे टेंडर होऊन ०७ जून २०२३ रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला. या आदेशानुसार हे काम ६ डिसेंबर २०२४ पूर्वीच पूर्ण होणे आवश्यक आहे. आज कार्यारंभ आदेश देऊन जवळपास एक वर्ष उलटून गेलेले आहे. तरीही या योजनेचे काम सुरू झालेले नाही. यात काहीतरी गौडबंगाल असल्याची शक्यता आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार आहे व पावसाचे कारण दाखवून काम सुरू करण्यास टाळाटाळ होऊ शकते. एकीकडे शहरातील ४५ हजार नागरिक प्रचंड मोठ्या पाणीटंचाईला तोंड देत आहेत. काही भागात तर १२ ते १५ दिवसाला पाणी मिळते. हे मिळणारे पाणी हे गढूळ, गाळ, मैला मिश्रित व अस्वच्छ येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झालेला आहे. म्हणून वाढीव ८७ कोटी २० लाख ४० हजार रकमेची वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करावे. या मागणीसाठी गुरुवारी (ता. ३०) शेवगाव नगरपालिका कार्यालयासमोर ‘मुक्काम ठोको आंदोलन’ शहरातील नागरिक करणार आहेत. यासाठी शेवगाव शहर नागरिक कृती समिती ठिकठिकाणी बैठका घेत जनतेची जनजागृती करत आहेत, असेही हर्षदा काकडे यांनी सांगितले.

Muddy Water
Muddy Water : शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा; उपाययाेजना करा, अन्यथा मुक्काम ठाेकाे आंदाेलनाचा काकडेंचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here