Mugdha-Prathamesh Haldi: मुग्धा-प्रथमेशला लागली हळद;फोटो व्हायरल

गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन या दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असून लग्नाच्या विधीला देखील सुरूवात झाली आहे. नुकताच या दोघांच्या घरी हळदी समारंभ पार पडला.

0
Mugdha-Prathamesh Haldi

Mugdha Vaishampayan: नगर : ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ (saregampa) या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गायक प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि गायिका मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) हे लवकरच लग्नगाठ (Wedding ceremony) बांधणार आहेत. दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असून लग्नाच्या विधीला देखील सुरूवात झाली आहे. नुकताच या दोघांच्या घरी हळदी समारंभ पार पडला. यावेळी मुग्धाने प्रथमेशच्या नावाची हळद लावली आहे. या दोघांचेही हळदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नक्की वाचा : शनिशिंगणापूर देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ; शिंदे फडणवीस सरकारची घोषणा

प्रथमेश आणि मुग्धा यांच्या घरी पारंपारिक पद्धतीने हा हळदी समारंभ पार पडलाय. दोघांनीही आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. मुग्धाने हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘हरिद्रा लापन । घाणा भरणे’, असे लिहिले आहे. या फोटोंमध्ये मुग्धासोबत तिच्या कुटुंबातील सर्व सदस्य खूपच आनंदी दिसत आहेत. तर प्रथमेशने देखील हळदी समारंभाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘हरिद्रा लापन । मांगलिक स्नान’,असे लिहिले आहे. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अवश्य वाचा : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदासाठी अपात्र

प्रथमेश लघाटेने १५ जूनला आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर मुग्धासोबतचा फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली होती.तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते. सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर ओळख होऊन एकमेकांना आयुष्याचा जोडीदार निवडणारी प्रथमेश आणि मुग्धा ही दुसरी जोडी आहे.यापूर्वी रोहित आणि जुईली यांच्यात देखील आधी मैत्री आणि नंतर प्रेम झालं होत. आणि नंतर दोघांनी लग्न केले. त्यानंतर आता प्रथमेश आणि मुग्धा लग्न करणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here