कोड रेड
Muharram : नगर : मोहरम (Muharram) सणानिमित्त नगर शहरातून कत्तलची रात्र मिरवणूक आज (ता. १६) रात्री, तर सवारी विसर्जन मिरवणूक उद्या (ता. १७) दुपारी निघणार आहे. त्यामुळे शहरातील काही रस्त्यांवर मिरवणूक वेळेत ‘नो व्हेईकल झोन’ (No Vehicle Zone) (वाहन विरहित क्षेत्र) ठेवण्याचा निर्णय जिल्हा पोलीस (Police) प्रशासनाने घेतला आहे.
नक्की वाचा: महाराष्ट्राला स्वाभिमानाची परंपरा – संजय राऊत
कत्तलची रात्र मिरवणूक
कत्तलची रात्र मिरवणूक आज (ता. १६) मध्यरात्री १२ ते उद्या (ता. १७) सकाळी ८ वाजेपर्यंत निघणार आहे. या कालावधीत छोटे बारा इमाम कोठला- फलटण चौकी – कोंड्यामामा चौक – मंगलगेट हवेली – कामठीपुरा – सरदार पटेल रस्ता – काच मशिद – आडते बाजार – डाळ मंडई – तेलीखुंट – कापड बाजार – मोची गल्ली – गुंदेचा चौक – जुना कापड बाजार – भिंगारवाला चौक – अर्बन बँक रस्ता – आझाद चौक – लक्ष्मीबाई कारंजा – पटवर्धन चौक – जुने कोर्टाची मागील बाजू – दो बोटी चिरा – सबजेल चौक – जुनी महापालिकेच्या समोरून – पंचपीर चावडी – जुना बाजार रस्ता – बुरुडगल्ली – धरती चौक – हातमपुरा – डावरेगल्ली – नालबंद खुंट – रामचंद्र खुंट – ब्राह्मण कारंजा – मंगलगेट हवेली तसेच राज चेंबर ते हुंडेकरी पार्किंग पर्यंतचा रस्त्यावर मिरवणूक राहणार आहे. त्यामुळे हा रस्ता आज मध्यरात्री पासून उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
अवश्य वाचा: जिओ,एअरटेलला धक्का; टाटा आणि बीएसएनएलमध्ये मोठा करार
सवारी विसर्जन मिरवणूक निघणार (Muharram)
उद्या (ता. १७) दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत सवारी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे या कालावधीत छोटे बारा इमाम कोठला – फलटण चौकी – कोंड्यामामा चौक – मंगलगेट हवेली – कामठीपुरा – सरदार पटेल रस्ता – काच मशिद – आडते बाजार – पिंजार गल्ली – पारशा खुंट – जुना कापड बाजार – खिस्त गल्ली – बुरुड गल्ली – जुना बाजार – पंचपीर चावडी – जुनी महापालिकेच्या समोरून – सबजेल चौक कॉर्नर – जुन्या कोर्टाच्या पाठीमागून – टांगे गल्ली चौक – चौपाटी कारंजा – दिल्ली गेट – सिद्धीबाग करबला मशिद – नीलक्रांती चौक – बालिकाश्रम रस्त्यापर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.