Muharram : माेहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

Muharram : माेहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

0
Muharram : माेहरम विसर्जन मिरवणूक शांततेत
Muharram : माेहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

Muharram : नगर : संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या नगरच्या मोहरम (Muharram) निमित्त बुधवार (ता. १७) काढण्यात आलेली विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन्ही मिरवणुकीदरम्यान जिल्हा पोलीस (Police) दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवला होता. बुधवारी शहरातील कोठला परिसरात मोहरम निमित्त सर्वधर्मिय (All Religious) समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. रात्री १२ वाजता कोठला येथील छोटे बारा इमाम यांची सवारी उठल्यानंतर कत्तलची रात्र मिरवणुकीस प्रारंभ झाला हाेता. मंगलगेट हवेली येथून मोठे बारा इमाम यांची सवारी उठली.

Muharram : माेहरम विसर्जन मिरवणूक शांततेत
Muharram : माेहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

नक्की वाचा: महारक्तदान शिबिराची दखल देशपातळीवर घेतली जात आहे : संग्राम जगताप

शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर मिरवणूक मार्गासह शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. मोहरम विसर्जन मिरवणूक वेळेत दिल्लीगेट बाहेर पडण्यासाठी सवारी खेळविणाऱ्या यंग पार्ट्यांना वेळेचे बंधन घालून देण्यात आले हाेते. संवेदनशील, अतिसंवेदशनील ठिकाणी वेगळा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला हाेता. कोठला येथून इमाम हुसेन यांच्या सवारीची मिरवणूक निघाली, तर मंगल गेट हवेली येथून इमाम हसन यांची सवारी निघाली. यंग पार्ट्यांचे कार्यकर्ते इमाम हुसेन यांची सवारी खेळवतात. कोठला, फलटण पोलीस चौकी, मंगलगेट हवेली, आडते बाजार, पिंजार गल्ली, जुना कापड बाजार, खिस्त गल्ली, जुना कापड बाजार, पंचपीर चावडी, जुनी महापालिका, कोर्टातील मागील बाजूने दिल्ली गेट, बालिकाश्रम रोड, सावेडी असा विसर्जन मिरवणूक मार्ग हाेता. रात्री उशिरा विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

अवश्य वाचा: नगरमध्ये नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा; देशभरातील खेळाडूंचा राहणार सहभाग

असा होता पोलीस बंदोबस्त (Muharram)

अतिरिक्त पोलीस अधीक्षक – २

पोलीस उपअधीक्षक – ४

पोलीस निरीक्षक – १८

सहायक निरीक्षक – ४१

पोलीस कर्मचारी – ६४१

राज्य राखीव दल – २ तुकड्या

शीघ्र कृती दल – १

दंगल नियंत्रक पथक – २

राज्य राखीव दर – २

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here