Asambhav Movie:नैनीतालमध्ये पार पडला ‘असंभव’ या चित्रपटाचा मुहूर्त;सचित पाटील व मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र

0
Asambhav Movie:नैनीतालमध्ये पार पडला ‘असंभव’ या चित्रपटाचा मुहूर्त;सचित पाटील व मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र
Asambhav Movie:नैनीतालमध्ये पार पडला ‘असंभव’ या चित्रपटाचा मुहूर्त;सचित पाटील व मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र

Asambhav Movie : मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील,(Sachin Patil) मुक्ता बर्वे (Mukta Barve) पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘असंभव’ (Asambhav Movie) ह्या त्यांच्या आगामी चित्रपटाताचा मुहूर्त नुकताच नैनीताल येथे पार पडला. नितीन प्रकाश वैद्य,सचित पाटील यांची मुंबई-पुणे एंटरटेनमेंट आणि शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्मस ह्या दोन्ही निर्मिती संस्था पहिल्यांदाच ‘असंभव’ या आगामी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र आल्या आहेत.

नक्की वाचा :  संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी

अभिनेते पुष्कर श्रोत्री करणार ‘असंभव’ सिनेमाचं दिग्दर्शन (Asambhav Movie)

वळू ‘नाळ’, ‘गच्ची’, अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ ते ‘लाईक आणि सबस्क्राईब’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असलेल्या नितीन प्रकाश वैद्य यांची भक्कम साथ या सिनेमाला लाभणार आहे. ‘क्षणभर विश्रांती’ आणि ‘साडे माडे तीन’ या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर सचित पाटील निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. तसच निर्माती शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा ‘नाच गं घुमा’ हा सिनेमा महाराष्ट्रभर गाजला होता. त्यामूळे या आगामी सिनेमाकडून देखिल प्रेक्षकांना अपेक्षा आहेत. हाय काय नाय का,उबुंटू या सिनेमानंतर आता दिग्दर्शक, अभिनेते पुष्कर श्रोत्री ‘असंभव’ या सिनेमाचं देखील दिग्दर्शन करत आहेत.

अवश्य वाचा : मोठी बातमी! भारतात आढळला एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण 

१ मे रोजी प्रदर्शित होणार चित्रपट  (Asambhav Movie)


इतक्या चांगल्या कलाकारांना एकत्र आणणारा ‘असंभव’ हा चित्रपट रहस्यपट आहे की थरारपट? ही पूर्णतः नवीन विषयावरची कलाकृतीं आहे की,एखाद्या जुन्याच विषयाशी याचे धागेदोरे जुळतायेत? या सगळया प्रश्नांच्या उत्तरांसह या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट येत्या १ मे २०२५ ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here