Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : नगर : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आत्तापर्यंत ७ लाख महिलांचे अर्ज पात्र ठरले आहे. पात्र ठरलेल्या महिलांना त्यांच्या बँक खात्यावर (Bank account) जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांप्रमाणे एकूण ३ हजार रुपयांचा प्रत्यक्ष निधी वितरणाचा राज्यस्तरीय प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून बालेवाडी क्रीडासंकुल, पुणे (Pune) येथे होणार आहे.
नक्की वाचा: शेवगावमधील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील दोघे वृंदावनमधून जेरबंद
सहकार सभागृह येथे कार्यक्रमाचे सहप्रक्षेपण (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana)
या कार्यक्रमाचे सहप्रक्षेपण, सहकार सभागृह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.