Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : नगर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana) नगर महापालिकेत डॉक्टर, अभियंते, परिचारिका, प्रयोगशाळा तज्ज्ञ यांसह विविध १४० पदे भरण्यात येत आहे. महापालिकेकडून योजना जाहीर करताच १२७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील ७२ जणांनी प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शविली आहे. २६ जणांना प्रशिक्षणासाठी नियुक्ती पत्र (Appointment letter) आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) व आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांच्या हस्ते सोमवारी (ता. १२) देण्यात आले.
नक्की वाचा : आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू’- संजय राऊत
राज्य शासनाकडून विद्यावेतन देण्यात येणार
युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. यात १२ वी पाससाठी सहा हजार रुपये, आय.टी.आय पदविकासाठी आठ हजार रुपये, पदविधर व पदव्युत्तरासाठी १० हजार रुपये या प्रमाणे विद्यावेतन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत नगर महापालिकेच्या आस्थापना वरील मंजूर असलेल्या दोन हजार ८७० पदांच्या पाच टक्के जागांवर म्हणजेज १४० पदांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवारांची निवड गुणपत्रकाच्या गुणानुक्रमानुसार करण्यात येणार आहे.
अवश्य वाचा: मनाेज जरांगे गरजले; आता विधानसभेला दणादण नाव घेऊन पाडणार, कुणाचे टेन्शन वाढणार?
या पदांवर काम करण्याची संधी (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana)
क्लर्क कम टायपिस्ट-३०, स्टेनो-४, अकाउंट क्लर्क-३, सहाय्यक ग्रंथपाल-१, संगणक प्रोग्रामर-३, कनिष्ठ अभियंता (सिव्हील)-५, कनिष्ठ अभियंता (मॅकेनिकल)-३, विद्युत पर्यवेक्षक-३, कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) १, मोटार मॅकेनिक-३, असिस्टंट गार्डनर-२, सहाय्यक क्रीडा अधिकारी-२, सॅनिटरी सब इन्स्पेक्टर-८, वैद्यकीय अधिकारी-१०, लॅब टेक्निशियन-३, कंपाउंडर-२, परिचारिका जीएनएम-१०, परिचारिका एएनएम-१०, फायरमन-१०, वॉटर लॅब टेक्निशियन-४, पंप चालक-५, फीटर/प्लंबर-५, इलेक्ट्रिशियन-५, वायरमन-५, सांख्यिकी सहाय्यक-३ अशा १४० पदांवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
महापालिकेत प्रशिक्षणासाठी १२७ जणांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. त्यापैकी ७२ जणांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांना नियुक्ती पत्र देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी लिपिक-१४, लॅब टेक्निशियन-३, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-२, स्टेनो-२, फार्मासिस्ट-१, ग्रंथपाल-१, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)-१, संगणक प्रोग्रामर-१, मोटार मेकॅनिक-१, अशा २६ जणांना नियुक्ती पत्र देण्यात आल्याचे आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व प्रशिक्षण मिळेल त्याचा फायदा त्यांना भविष्यात होईल. तसेच या माध्यमातुन विद्यावेतन मिळणार असल्याने नगर शहरातील युवकांना रोजगारही उपलब्ध होईल. त्यामुळे या योजनेचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.