Muktai New Movie: ‘मुक्ताई’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित 

नगर : संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण असलेल्या संत मुक्ताबाईंचे महान कार्य 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे या चित्रपटाचे एक नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

0
'मुक्ताई’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित

Muktai Movie: नगर : संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई (Saint Muktabai) या सर्वांना परिचित आहेत. याच मुक्ताबाईचे महान कार्य ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ (Sant Dnyaneshwaranchi Muktai) या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक नवे आकर्षक पोस्टर (New Poster Relese) प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या छायेत बसलेली दिव्य मुक्ताई दिसून येत आहे.  

नक्की वाचा : गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’चं पहिले पोस्टर प्रदर्शित  

मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेने सिद्ध जीवन होते.अशा या ‘मुक्ताई’चे  माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर  आपल्याला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन  केले आहे. ‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.

हेही वाचा : आजपासून एलपीजी गॅस महागला !

आदिमायेचा अवतार मानल्या जाणाऱ्या मुक्ताईने त्या काळात स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून दिले. संत ज्ञानेश्वरांच्या भागवत धर्माच्या क्रांतीचा ती आधार बनली. केवळ चौदा ते अठरा वर्षांच्या अल्प अवतार आयुष्यात मुक्ताईने शेकडो अभंग रचून स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या संत मुक्ताई यांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात. जून २०२४ मध्ये हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here