Mula Dam : मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडले

Mula Dam : मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडले

0
Mula Dam
Mula Dam : मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडले

Mula Dam : राहुरी : मुळा धरणातून (Mula Dam) आज दुपारी तीन वाजता मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) कार्यकारी अभियंता सायली पाटील यांचे हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आले. उपअभियंता विलास पाटील, शाखाधिकारी राजेंद्र पारखे, सलीम शेख आदी यावेळी उपस्थित होते. धरणाच्या सर्वच्या सर्व अकरा दरवाजातून दोन हजार क्युसेकने पाणी सोडले गेले. आवश्यकतेनुसार या विसर्गात वाढ केली जाणार आहे. पाणी सोडण्याआधी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Warning) देण्यात आला आहे. पाणी नदीपात्रात सोडल्याने लाभधारक क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Mula Dam

अवश्य वाचा: मनाेज जरांगेंच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक घ्या; मराठा आरक्षणावर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

2000 क्युसेक्सने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग

मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता 26,000 दलघफु (26 टीएमसी) आहे. 12 ऑगस्ट 2024 रोजी मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS) नुसार १ ते १५ ऑगस्ट दरम्यान पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज (ता.12) दुपारी तीन वाजता मुळा धरणातून 2000 क्युसेक्सने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.

नक्की वाचा : ‘राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी फडणवीसांच्या विरोधात बोलावं’- रोहित पवार

टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल (Mula Dam)

आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल. तरी याबाबत मुळा नदीकाठच्या गावातील चल मालमत्ता, चीजवस्तु , वाहने, पशुधन , शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी, नदीपात्रात प्रवेश करु नये, कुठलीही जिवित व वित्त हानी होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here