Mula Dam : मुळा धरणातून आवर्तन सोडले

Mula Dam : मुळा धरणातून आवर्तन सोडले

0
Mula Dam : मुळा धरणातून आवर्तन सोडले
Mula Dam : मुळा धरणातून आवर्तन सोडले

Mula Dam : राहुरी: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या माध्यमातून वांबोरी चारीसाठी आवश्यक ती तरतूद करून योजना सुरळीत चालण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी केले. मुळा धरणातून (Mula Dam) वांबोरी चारीला तसेच मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातूनआमदार कर्डिले यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले, यावेळी ते बोलत होते. 

नक्की वाचा : ‘राम शिंदे ‘सर’असल्याने त्यांना क्लास चालवण्याची सवय’- देवेंद्र फडणवीस

आमदार कर्डिले म्हणाले,

जिल्ह्यातील मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच शपथ घेतली असून लवकरच ते पालकमंत्री होणार आहेत. जिल्ह्याच्या वाटचालीत नामदार विखेंचे योगदान असून ते मंत्री झाल्याने आपणच मंत्री झालो असे वाटत असल्याचे समाधान आहे. आपण सातत्याने वांबोरी चारीच्या लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे म्हणून प्रयत्नशील असून पाटबंधारे विभागाने वांबोरी चारी देखभाल दुरुस्ती करिता चौदा कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून त्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. मागील काळात शेतकऱ्यांवर एकोणावीस टक्के वसुलीची जबाबदारी टाकण्यात आली होती व उर्वरित जबाबदारी शासनाने उचलली होती तरी देखील आज अखेर शेतकऱ्यांकडे सुमारे साडेपाच कोटी रुपयांची थकबाकी आहे. दरवर्षी साधारणतः ७० लाख रुपये वीज बिलासाठी भरणे अपेक्षित आहे. याबाबत मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून थकबाकी भरण्यासाठी देखील तरतूद करण्यासाठी प्रयत्न करू. परंतु शेतकऱ्यांनी देखील योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे.

अवश्य वाचा : जानेवारीत रंगणार मानाची ‘अहिल्यानगर महाकरंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते (Mula Dam)

याप्रसंगी ज्येष्ठ नेते अँड. सुभाष पाटील,  बाळकृष्ण बानकर, माजी सभापती संभाजी पालवे, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, अँड. तान्हाजी धसाळ, धनराज गाडे, हरिभाऊ कर्डिले, भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, शिवसेना तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे, अमोल भनगडे, सुरसिंग पवार, एकनाथ आटकर, रवींद्र म्हसे, माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, दिपक कार्ले, शरद पेरणे, अशोक दहातोंडे, मंजाबापू घोरपडे, अशोक उंडे, कैलास पवार, हनुमंत घोरपडे, सोमनाथ हरेर, महेंद्र तांबे, बंडू पाठक, शिवाजी सागर, प्रभाकर हरिश्चंद्र, शिवाजी साठे, सुभाष निमसे, बाळासाहेब घोरपडे, मधुकर मगर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी केले.