Mula Dam : मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडले

Mula Dam : मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडले

0
Mula Dam : मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडले
Mula Dam : मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडले

Mula Dam : राहुरी: येथील मुळा धरणातून (Mula Dam) बुधवारी (ता.९) पाच वाजता पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता (Executive Engineer) सायली पाटील यांनी दिली. धरणाच्या अकरा दरवाजातून तीन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येईल. नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा (Caution Warning) देण्यात आला आहे.

अवश्य वाचा : पुणे अहिल्यानगर रेल्वेचा डीपीआर सादर खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याचे यश

मुळा धरणाचा एकुण साठा ७०%

२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेले मुळा धरणाचा एकुण साठा १८१६१ दलघफु (७०%) होत असल्यामुळे तसेच धरणात पाणी आवक सुरु असल्याने जलाशय परिचलन सूची नुसार नदीमध्ये ३००० क्यूसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्यामुळे विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ केली जाणार आहे. तरी नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे व नदीपात्रात प्रवेश करू नये. तसेच कुठलीही जीवित व वित्तहानी होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसिंचन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Mula Dam : मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडले
Mula Dam : मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडले

नक्की वाचा : गुजरातमध्ये पुलाचे अचानक २ तुकडे;अनेक वाहने नदीत कोसळली,३ जणांचा मृत्यू

मुळाधरणात १७ हजार ८४४ दशलक्ष घनफुट पाणी साठा (Mula Dam)

आज संध्याकाळी सहा वाजता मुळाधरणात १७ हजार ८४४ दशलक्ष घनफुट पाणी साठा होता. आवक २२४७ क्युसेक्स होती. या हंगामात नदीपात्रात आज प्रथमच पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडीला समन्यायी धोरणानुसार यंदा पाणी सोडण्याची वेळ येण्याची शक्यता कमी आहे. कारण जायकवाडी पाणीसाठा आवश्यकतेनुसार आज जेवढा हवा, त्यापेक्षा तो अधिक आहे. आज राहुरीत सतत दुसऱ्या दिवशी संततधार पावसाची हजेरी होती. दिवसभर रिमझिम भीज पाऊस पडला. खरीपाच्या पिकांना हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.