Mumbai : मुंबईत तुफान वादळ

Mumbai : मुंबईत तुफान वादळ

0
Mumbai
Mumbai : मुंबईत तुफान वादळ

Mumbai : नगर : मुंबई (Mumbai), ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये पाऊस (Rain) आणि वादळी वारे वाहू लागल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मुंबईत दोन ठिकाणी होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर मध्य रेल्वेची (Railway) सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऑफिसमधून घर गाठणाऱ्या मुंबईकरांचे हाल सुरु झाले आहेत. घाटकोपर या स्टेशनवर गर्दीच गर्दी झाली आहे.

हे देखील वाचा: हवामान विभागाचा अलर्ट; जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस वादळी पाऊस

पेट्रोल पंपाववर कोसळला महाकाय होर्डींग (Mumbai)

राज्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, आज वादळी वाऱ्यासह राजधानी मुंबई पावसाच्या तडाख्यात सापडल्याचं दिसून आलं. काही वेळाच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर, वडाळा, भायखळा परिसरात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, घाटकोपर येथील पेट्रोल पंपाववर महाकाय होर्डींग कोसळल्याने तब्बल 70 ते 80 चारचाकी गाड्या या बॅनरखाली अडकल्या आहेत. दुसरीकडे वड्याळ्यातही टॉवर कोसळून काही वाहनं टॉवरखाली अडकली आहेत.

नक्की वाचा: आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

भर दिवसा काळाकुटट् अंधार (Mumbai)

भर दिवसा काळाकुटट् अंधार होऊन मुंबईत तुफान वादळ आले आहे. प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्यासह सर्वत्र धुळ उडत आहे. पावसाळा सुरु होण्याआधीच मुंबईत पावसाचे आगमन झाले आहे. भर दिवसा काळाकुट्ट अंधार होऊन ढग दाटून आले आहेत. वादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मुलुंडमध्ये जोरदार पाऊस पडला आहे.

मुंबईची मेट्रो सेवा विस्कळीत
वादळामुळे मुंबईची मेट्रो सेवा देकील विस्कळीत झाली आहे. एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरचा पत्रा कोसळला. पत्रा कोसळल्याने मेट्रो सेवा थांबवण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here