Mumbai : कोपरगाव: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानात सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. लाखो मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाले असून, तिथे हॉटेल्स व दुकाने बंद असल्याने अन्न-पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव सकल मराठा समाजाने (Maratha Society) दिलेल्या “प्रत्येक घरातून एक शिदोरी” या आवाहनाला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे केवळ मराठा समाजच नव्हे तर मुस्लिम समाज, आंबेडकर समाजासह विविध जाती-धर्मातील नागरिकांनी सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याची जिवंत मिसाल घडवली.
नक्की वाचा : तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण होऊ शकते,तर महाराष्ट्रात का नाही ?- शरद पवार
आरक्षण देत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही
रविवारी (ता.३१) कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे फरसाण, भाकरी-चपात्या, शेंगदाणा चटणी, पाण्याच्या बाटल्या आणि विविध खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात जमा करून गाडीभर शिदोरी मुंबईकडे रवाना करण्यात आली. त्यात विविध समाजच्या वतीनेही पाणी बॉटल व नाष्टा पाकिटाची मदत करण्यात आली. तसेच मेहमूद सैय्यद यांच्या वतीने मराठा समाजाला पाणी बॉटल व नाष्टा पाकिटे देऊन जो पर्यंत मराठयांना आरक्षण देत नाही तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आवश्य वाचा : सोनू सूद करणार स्टार प्लसच्या नवीन शो ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च
सर्व जाती-धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Mumbai)
गाडी रवाना होताना शहरातील सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व जाती-धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “कोपरगावातून निघालेली ही शिदोरी म्हणजे आंदोलनाला फक्त अन्नाची नव्हे तर सामाजिक ऐक्याची ताकद देणारी शिदोरी आहे,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.