Mumbai Local Movie : अभिनेता प्रथमेश परब (Actor Prathamesh Parab)आणि ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar)यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मुंबई लोकल’ (Mumbai Local Movie) हा चित्रपट ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. आजवर मराठी चित्रपटात मुंबई लोकल दिसली असली तरी लोकलच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथा पाहता येणार आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगरमध्ये उभारली गेली पुस्तकांची गुढी!
अभिजीत यांनी केलं “मुंबई लोकल” चित्रपटाचे दिग्दर्शन (Mumbai Local Movie)
बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि आनंदी एंटरटेन्मेंट प्रस्तुत “मुंबई लोकल” या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजित यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी आणि आनंदी एंटरटेन्मेंटचे प्राची राऊत, सचिन अगरवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण,अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अवश्य वाचा : बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला मारहाण;सुरेश धस यांचा दावा!
चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे.असोसिएट प्रोड्युसर त्र्यंबक डागा,सह दिग्दर्शक विनोद शिंदे असून कलादिग्दर्शक सुमित पाटील आहेत. ऍक्शन सुनील रॉड्रिग्ज, निलेश गुंडाळे, कार्यकारी निर्माता हर्षवर्धन वावरे, देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपटात नेमकं काय ? (Mumbai Local Movie)
“मुंबई लोकल” या चित्रपटात मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये घडणारी एक मनोरंजक प्रेम कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. टाइमपास’, ‘टकाटक’, ‘बालक पालक’ अशा अनेक चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबने आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले आहे. ज्ञानदाच्या ‘सख्या रे’, ‘जिंदगी नॉट आऊट’, ‘शतदा प्रेम करावे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ अशा मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय ‘धुरळा’सारखे काही चित्रपटही तिनं केले आहेत. मुंबई लोकलच्या पार्श्वभूमीवर घडणारी एक हलकीफुलकी, तरल प्रेमकथा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. त्यासाठी ११ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.