Mumbai Railway Accident : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून काही अंतरावर झालेल्या रेल्वे अपघातात आज सोमवारी (ता.९) पाच प्रवाशांचा मृत्यू (Five passengers died) झाला. मध्य रेल्वेमार्गावरील दिवा (Diva) आणि मुंब्रा (Mumbra) या स्थानकांदरम्यान सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात (Railway Accident) घडला. दोन लोकल ट्रेन आजुबाजूने जास्त असताना या ट्रेन्सच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला. त्यामुळे आठ जण रेल्वे ट्रॅकवर पडल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
नक्की वाचा : गृहकर्ज,वाहन कर्ज स्वस्त होणार;रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला
प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने अपघात (Mumbai Railway Accident)
आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान एक लोकल ट्रेन कसाऱ्याच्या दिशेने आणि दुसरी सीएसएमटीला जात होती. या दोन्ही लोकल ट्रेन आजूबाजूच्या ट्रॅकवरुन जात होत्या. या दोन्ही ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे अनेक प्रवासी फुटबोर्डवर उभे होते. यापैकी काही प्रवाशांच्या खांद्याला बॅगा लावल्या होत्या. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने हे प्रवासी ट्रेनमधून बाहेर आले होते. या दोन्ही लोकल ट्रेन एकमेकांच्या बाजूने जात असताना त्या वेगात होत्या. यावेळी काही प्रवाशांच्या बॅगचा धक्का दुसऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांना लागला आणि फुटबोर्डवर काही इंच अंतरात पाय ठेवून उभे असलेले प्रवासी ट्रेनमधून खाली पडले, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली.
अवश्य वाचा : विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही, कोल्हापूरच्या नव्या एसपींचा आदेश
रेल्वेचा ऑटोमॅटिक डोअरच्या गाड्या आणण्याचा निर्णय (Mumbai Railway Accident)
हा अपघात साडेनऊ वाजता घडला. त्यानंतर ९.५० पर्यंत या प्रवाशांना रुग्णवाहिका आणून रुग्णालयात नेण्यात आले,अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहे. दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या अपघातानंतर मध्य रेल्वेने आता भविष्यात ऑटोमॅटिक डोअर च्या गाड्या आणण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल. यामध्ये नव्या २३८ गाड्यांचा आणि एसी लोकलचा समावेश असेल. तसेच सध्याच्या लोकल ट्रेनलाही दरवाजे लावण्याबाबतही विचार केला जाईल,अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली. हा अपघात घडला तेव्हा दोन्ही लोकल ट्रकमधले अंतर दीड ते दोन मिटर इतके होते, अशी माहिती एका जखमी प्रवाशाने दिली.