Mumbai Rain Alert:मुंबईत पावसाची धुवाँधार बॅटिंग;शाळांना सुट्टी जाहीर

0
Mumbai Rain Alert:मुंबईत पावसाची धुवाँधार बॅटिंग;शाळांना सुट्टी जाहीर
Mumbai Rain Alert:मुंबईत पावसाची धुवाँधार बॅटिंग;शाळांना सुट्टी जाहीर

नगर : पावसाळा सुरु असल्याने राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी (Heavy Rain) लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाची संततधार सुरु आहे. अशातच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. पावसाचा जोर कायम असून मुंबई (Mumbai), ठाणेकरांसाठी पुढील ४८ तास अतिशय महत्वाचे ठरणार आहे. कारण मुंबई ठाण्याला पुढील ४८ तासांसाठी हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. तर संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर (Holiday Declared for Schools) करण्यात आली आहे.

नक्की वाचा : कोणी काय खावं हे सरकारनं ठरवू नये;राज ठाकरे कडाडले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पुरस्थितीचा आढावा (Mumbai Rain Alert)

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्यातील पूरग्रस्त भागाचा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद सुरु आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.

अवश्य वाचा : तुम्हाला माहित आहे का,भारताचा राष्ट्रध्वज कोणी बनवला ? वाचा सविस्तर…

मुंबईतील सर्व शाळा,महाविद्यालयांना सुट्टी  (Mumbai Rain Alert)

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा,महाविद्यालयांना आज दुपारच्या सत्रात सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज, सोमवारी (ता.१८) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर,काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे.