Municipal Commissioner : महापालिका आयुक्तांनी नगरकरांना केले ‘हे’ आवाहन

Municipal Commissioner : महापालिका आयुक्तांनी नगरकरांना केले 'हे' आवाहन

0
Municipal Commissioner : महापालिका आयुक्तांनी नगरकरांना केले 'हे' आवाहन
Municipal Commissioner : महापालिका आयुक्तांनी नगरकरांना केले 'हे' आवाहन

Municipal Commissioner : नगर : शहरात डासांमुळे हिवताप, डेंग्यू व चिकनगुनिया (Dengue and Chikungunya) सारखे आजार वाढत आहेत. या विरोधात महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) डेंग्यू आजार प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक रविवारी, दर आठवडा-एक दिवस-एक तास, मोहीम हाती घेतली आहे. उद्या (ता. २१) या मोहिमेचे पहिला दिवस आहे. या मोहिमेत नगरमधील नागरिक व सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) यशवंत डांगे यांनी केले आहे.

आयुक्त डांगे यांनी सांगितले की,

सध्या मॉन्सूनचा कालावधी सुरू झालेला असून पारेषण काळ सुरू आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून हिवताप, डेंग्यू व चिकनगुनिया या किटकजन्य रोगांच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नगरमध्ये हिवताप, डेंग्यू व चिकनगुनिया या किटकजन्य रोगांच्या साथी उद्भवू नयेत याकरिता नागरिकांनी त्यांचा रहिवासी परिसरात डासोत्पत्ती टाळणे आणि व्यक्तिगत स्वतः काय काळजी घ्यावी याबाबत महापालिकेतर्फे व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. डासांच्या अंड्यापासून प्रौढ डास बनण्याच्या प्रक्रीयेला ७-१० दिवस लागतात, त्यामुळे हे चक्र तोडण्याकरीता कोरडा दिवस पाळणे आणि आपल्या घराच्या परिसरामध्ये डासोत्पत्ती स्थाने शोधून नष्ट करणे अशी अभियानाची संकल्पना राबवायची आहे. सध्या महापालिकेमार्फत कंटेनर सर्व्हे तपासणी, धुरीकरण, किटकनाशक फवारणीचे काम सुरू आहे.

शहरवासियांमध्ये आजारांबाबत जनजागृती (Municipal Commissioner)

या व्यापक जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून नगर महापालिकेचे सर्व विभागप्रमुख आणि सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी करावयाची असुन त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घराच्या परिसरामध्ये अस्वच्छता व डास उत्पत्ती होणार नाही. याकरिता काळजी घेवुन आणि ते इतरांनाही समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी नगर महापालिका कार्यक्षेत्रातील शहरवासियांमध्ये डेंग्यू व किटकजन्य आजारांबाबत जनजागृती होण्यासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी हे पुढील चार महिने दर रविवारी खालील सूचनांचा अवलंब करून आपल्या घराच्या परिसरामध्ये डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्याकरिता कार्यवाही करावी, अशी सूचना आयुक्त यशवंत डांगे यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here