
Municipal Commissioner : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरासह उपनगरात मूलभूत सुविधांचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. उपनगरातील केडगाव परिसरात दूषित पाणी, ड्रेनेज व अंतर्गत रस्त्याचा प्रश्न समोर आला आहे. याबाबत महिलांनी महापालिका प्रशासनाला (AMC) वारंवार निवेदन देऊन ही प्रश्न सुटत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) फक्त बोलतात मात्र, करत काहीच नाही, असा आरोप महिलांनी केला आहे. येत्या १० दिवसात ड्रेनेज, दूषित पाणी तसेच अंतर्गत रस्त्याचा प्रश्न न सुटल्यास आयुक्तांच्या तोंडाला काळे फासणार, असा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे.
नक्की वाचा : लोकसभेत मंजूर झालेल्या ‘वक्फ बोर्ड’ विधेयकाला विरोध का ?
ड्रेनेच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
केडगाव येथील प्रभाग क्रमांक १५ मधील संकल्प कॉलनी परिसरात ड्रेनेज, रस्त्यांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ड्रेनेच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आजारी पडत आहेत. महापालिका प्रशासन तसेच आयुक्त यशवंत डांगे यांना या प्रश्ना संदर्भात वारंवार निवेदन दिले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. असा आरोप महिलांनी केला आहे. यावेळी रेश्मा जगताप, पूजा वांजोळे, शीतल मोळके, सुप्रिया वणवे, शुभांगी नाणेकर, सीमा कुलांगे, लंका काकडे, रेखा जाधव, मुलेश कुलथे, सचिन बागल, वैशाली जपे, सुजाता तारडे, मीना वणवे, प्राजक्ता कारले, सायली शिंदे, दीपा टकले, संगीत मोरे, सुजाता तरडे, माया जाधव, सुवर्णा शिंदे, उर्मिला शिंदे, जयश्री शिंदे, संभाजी महाले, प्राजक्ता कार्ले आदींसह नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : रस्त्याच्या वादातून लोखंडी पाईपने मारहाण; गुन्हा दाखल
नागरिकांना दूषित पाण्याच्या पुरवठा (Municipal Commissioner)
संकल्प कॉलनीत चेंबर लाईन फुटल्याने दूषित पाणी जमिनीत मुरते, येथूनच पिण्याच्या पाण्याची लाईन जात असल्याने नागरिकांना दूषित पाण्याच्या पुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील बहुतांशी जण साथीच्या आजाराने ग्रासले आहेत. तसेच चेंबर मधील मैलामिस्त्रीत पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिका प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवत आहे. महापालिकेचे कर्मचारी परिसराची पाहणी न करताच ले आउट मंजूर करत आहेत. त्यामुळे अशा समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष परिसराची पाहणी करून ले आउट मंजूर करावा, अन्यथा अशा ड्रेनच्या समस्यांना नागरिकांना कायमच तोंड द्यावे लागेल, असा आरोप त्यांनी केला.
‘आयुक्त फक्त बोलतात मात्र, करत काहीच नाही’
महापालिकेच्या मोकळ्या जागेत वयोवृध्दांसाठी तसेच लहान मुलांसाठी जॉगिंग ट्रॅक करावा. तसेच एखादे मंदिर उभारावे, अशी मागणी होत आहे. मात्र, या प्रभागातील महापालिकेचा मोकळ्या भूखंडामध्ये ड्रेनेजचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या परिसरात मोठे गवत तसेच बाभळी उगल्या आहेत. हे मोकळे भूखंड स्वच्छ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, याबाबत ‘आयुक्त फक्त बोलतात, करत काहीच नाही’, असा आरोप रेश्मा जगताप यांनी केला आहे.