Municipal Corporation Election 2025: राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला;१५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल  

0
Municipal Corporation Election 2025: राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला;१५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल  
Municipal Corporation Election 2025: राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला;१५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल  

नगर: राज्यातील महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदमध्ये महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान (Voting will be held on January 15) होणार आहे, तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी (Vote Counting) होणार आहे. राज्यातील एकूण २९ महापालिकांचा यामध्ये समावेश असून, एकूण २८६९ जांगासाठी ही निवडणूक असणार आहे. आजपासून या महापालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू (Code of Conduct applies) झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात आली आहे.

नक्की वाचा: राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद;महापालिका व जिल्हा परिषदेच्या तारखा जाहीर होणार?

३ जानेवारीला होणार चिन्हाचं वाटप  (Municipal Corporation Election 2025)

निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर ३१ डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर २ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. ३ जानेवारी रोजी चिन्हाचं वाटप होणार आहे, तर १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे.

अवश्य वाचा: ‘मनरेगा’तून महात्मा गांधींचे नाव गायब होणार,’विकसित भारत जी राम जी’ नावाने नवा कायदा 

राज्यातील २९ महापालिकेसाठी निवडणूक  (Municipal Corporation Election 2025)

राज्यातील एकूण २९ महापालिकांसाठी निवडणूक आयोगानं आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे, त्यानुसार २८६९जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. २८६९ जागांपैकी १ हजार ४४२ जागा या महिलांसाठी राखीव आहेत, तर ३४१ जागा या एससीसाठी राखीव असून, एसटीसाठी ७७ जागा राखीव आहेत. तर ओबीसींसाठी ७५९ जागा राखीव आहेत.