Municipal Corporation Election: निवडणुकीत ‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास काय होणार ?

0
Municipal Corporation Election: निवडणुकीत ‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास काय होणार ?
Municipal Corporation Election: निवडणुकीत ‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास काय होणार ?

नगर : महापालिका निवडणुकीत (Municipal Corporation Election) जवळपास ६८ उमेदवार ‘बिनविरोध’ (68 Candidates Were Elected Unopposed) निवडून आलेत. याची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) घेतली आहे. ‘बिनविरोध’ प्रकरणातील तक्रारीत तथ्य आढळल्यास त्या प्रभागाची निवडणूक रद्द करून तिथे नव्याने निवडणूक प्रक्रिया (New election process) राबवली जाईल,असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे. जिथे बिनविरोध निवडणूक झाली आहे, तिथे संबंधित महापालिका आयुक्तांना स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

नक्की वाचा: ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे निधन;’असा’होता त्यांचा पायलटपासून राजकारणापर्यंतचा प्रवास   

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत देखील ५ उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. तर ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची चौकशी करावी,चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल जाहीर करू नये, अशी मागणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी (ता.५) राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना भेटून केली. या भेटीनंतर आयोगाने महापालिका आयुक्तांकडून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे जाधव यांनी सांगितले.  

अवश्य वाचा: लाडकी बहीण योजना महापालिकेतही गेमचेंजर ठरणार? कधी मिळणार डिसेंबरचा हफ्ता?  

‘नोटा’चा उपयोग नाही (Municipal Corporation Election)

बिनविरोध जागांवर प्रत्यक्ष मतदान घ्यावे आणि मतदारांना ‘नोटा’ची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र नियमानुसार, एकच उमेदवार असेल तेथे निवडणूक घेता येत नाही. न्यायालयाने आदेश दिले तरी अंमलबजावणी या निवडणुकीत होणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

६९ प्रकरणांची होणार चौकशी (Municipal Corporation Election)

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीत आतापर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या अंदाजे ६९ प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एखाद्या प्रभागातून एकमेव उमेदवार निवडणूक लढवत असेल आणि त्या परिस्थितीत मोठ्या संख्येने मतदारांनी ‘नोटा’ (वरीलपैकी कोणीही नाही) हा पर्याय निवडला तर अशावेळी निकाल काय असेल, हे स्पष्ट करावे, अशी विनंती जाधव यांनी याचिकेत केली आहे.