Municipal Hospital : नगर : महापालिकेचे उपमहापौर अॅड. धनंजय जाधव (Adv. Dhananjay Jadhav) यांनी दातरंगे मळा येथील हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (Hindu Dawn Emperor Balasaheb Thackeray’s Hospital) येथे अचानक भेट देत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.“महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) माध्यमातून आरोग्य सुविधा मोफत देणे ही जनसेवेची खरी व्याख्या आहे. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेत आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे प्रतिपादन उपमहापौर अॅड. धनंजय जाधव व्यक्त यांनी केले. या भेटीदरम्यान त्यांनी डॉक्टर व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत ओपीडी, औषध वितरण, तपासणी आणि सुविधा व्यवस्थेची तपासणी केली. या वेळी नगरसेवक महेश लोंढे आणि डॉ. गौरव देशमुख उपस्थित होते.
नक्की वाचा : पाथर्डी पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष
दररोज शंभर रुग्णांना सेवा देण्याचे उद्दिष्ट
उपमहापौर अॅड. धनंजय जाधव म्हणाले, “केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत, परंतु या सुविधा अनेक नागरिकांना माहित नसतात. त्या जनतेपर्यंत पोहोचाव्यात म्हणून सर्व दवाखान्यांच्या बाहेर आरोग्य सेवांचा तपशील असलेले फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. ते पुढे म्हणाले की, “दातरंगे मळा येथील ‘आपला दवाखाना’ सध्या दररोज ३० ते ४० ओपीडी रुग्णांची तपासणी करतो. ही संख्या वाढवून दररोज शंभर रुग्णांना सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आरोग्य सेवांविषयी जनजागृती वाढवून नागरिकांनी आपल्या प्राथमिक तपासण्या वेळेत करून घ्याव्यात.
जाधव म्हणाले की, “अनेक वेळा सर्वसामान्य कुटुंबांतील व्यक्ती आर्थिक परिस्थितीमुळे आजारपण अंगावर काढतात, त्यामुळे आजार गंभीर बनतो. महापालिकेच्या दवाखान्यांत मोफत तपासण्या आणि औषधे उपलब्ध आहेत. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा.
अवश्य वाचा : अजितदादांबद्दलची मुंबईत न सांगितलेली गोष्ट रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन सांगितली…
अधिकाधिक नागरिकांना सेवांचा लाभ देण्याचा प्रयत्न (Municipal Hospital)
नगरसेवक महेश लोंढे म्हणाले, “दवाखान्यात आल्यावर सुरुवातीला असं वाटलं की व्यवस्था विस्कळीत असेल, पण प्रत्यक्ष पाहणी केली असता चांगली शिस्तबद्ध व्यवस्था आणि गुणवत्तापूर्ण सेवा दिली जात असल्याचे दिसले. नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा.
ते पुढे म्हणाले, “प्रभाग क्रमांक 9 मध्ये आरोग्य जनजागृती उपक्रम सुरू करण्यात येईल, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला या सुविधांची माहिती मिळेल.
डॉ. गौरव देशमुख म्हणाले, “हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. येथे नागरिकांना औषधे पूर्णपणे मोफत दिली जातात. येणाऱ्या दिवसांत ओपीडीची क्षमता वाढवून अधिकाधिक नागरिकांना या सेवांचा लाभ देण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.



