Municipality : महापालिकेतर्फे तालयोगी प्रतिष्ठानचा गौरव – महापौर रोहिणी शेंडगे

सहकुटुंब ढोल ताशांच्या गजरात निघालेली देखणी विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोणा एका मंडळासाठी वादन न करता, तालयोगी वाद्यपथक स्वतंत्रपणे यशस्वीरित्या आयोजन करत आले आहे.

0


 नगर : सार्वजनिक गणेशोत्सवात (Ganeshotsav) आजवर अवघ्या महाराष्ट्रात (Maharashtra) कुठेही न राबवली गेलेली एक अभिनव संकल्पना तालयोगी प्रतिष्ठानने (Talyogi Pratishthan) नगर शहरात सर्वप्रथम सुरू केली, ती म्हणजे ‘अनंतदर्शन’ घरगुती गणेश मूर्तीचा भव्य विसर्जन सोहळा. या सोहळ्यात नगर शहरातील भक्तगणाची आपल्या घरच्या लाडक्या बाप्पाला पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत निरोप द्यावा ही इच्छा असते ती तालयोगी प्रतिष्ठान गेल्या १० वर्षांपासून पूर्ण करत आहे. सहकुटुंब ढोल ताशांच्या गजरात निघालेली देखणी विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोणा एका मंडळासाठी वादन न करता, तालयोगी वाद्यपथक स्वतंत्रपणे यशस्वीरित्या आयोजन करत आले आहे. त्यांच्या या चांगल्या कामाचा गौरव महापालिकेतर्फे (Municipality) करण्यात आला. हा तालयोगी प्रतिष्ठानच्या चांगल्या कार्याचा गौरव करण्यात आला असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.  

हे देखील वाचा : हंगा येथे सकल मराठा समाजाचे आरक्षणासाठी गाव बंद व एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

महापालिकेतर्फे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धेतील मराठमोळ्या महान संस्कृतीचे दर्शन घडवणारे तालयोगी प्रतिष्ठानला प्रथम क्रमांकांचे बक्षीस वितरण महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक निखिल वारे, उपायुक्त अजित निकत, उपायुक्त सचिन बांगर, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, श्री तालयोगी प्रतिष्ठानचे तन्मय घोडके, सुजित चव्हाण, कैवल्य कुलकर्णी, विकी वाघ, किशोर कानडे आदी उपस्थित होते.  

नक्की वाचा : नेवासा येथे उपोषणाच्या पाचव्या दिवशी बंदला १०० टक्के प्रतिसाद

तालयोगी प्रतिष्ठानने सुरु केलेल्या घरगुती अनंतदर्शन मिरवणूक पथकाचे हे 10 वे वर्ष आहे. वय वर्ष 6 ते 60, मुली महिला असे जवळपास 250 वादक यांचा त्यात सहभाग आहेत. ढोल,ताशा, झांज यांच्या तालावर थिरकणारे 21 ध्वजधारी हिंदू धर्माबद्दल जाज्वल्य अभिमान जागवणाऱ्या घोषणा आणि शेकडो गणपती बाप्पा घेऊन निघालेला अती सुंदर अनंतदर्शनचा रथ आणि पथकाच्या वतीने २१०० रामरक्षेच्या प्रतीचे आणि घटासाठी लागणाऱ्या सप्तधान्याचे वाटप ही मिरवणुकीची वैशिष्ट्य ठरली. या वर्षी श्री तालयोगी वाद्यपथकासोबतच शिवसूर्य मर्दानी आखाडा यांचे लाठीकाठी संचलन, बुऱ्हाणनगरचे हलगी पथक आणि  साज लेझीम पथक यांनीही मिरवणुकीची शोभा वाढवली जाते. श्री तालयोगी प्रतिष्ठानच्या अनंत दर्शन मिरवणुकीची सुरुवात प्रोफेसर चौकातून होत असते. यावेळी सहभागी सर्व पथकांनी गणपती बाप्पाला मानवंदना दिली जाते. यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. शेवट यशोदानगर येथे झाला. तालयोगी वाद्यपथकातील सर्व वादकांनी आपल्या हातानी सर्व गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन केले जाते.