Muralidhar Mohol : लाल मातीचे गत वैभव मिळून द्यायचे – मुरलीधर मोहोळ

Muralidhar Mohol : लाल मातीचे गत वैभव मिळून द्यायचे - मुरलीधर मोहोळ

0
Muralidhar Mohol : लाल मातीचे गत वैभव मिळून द्यायचे - मुरलीधर मोहोळ
Muralidhar Mohol : लाल मातीचे गत वैभव मिळून द्यायचे - मुरलीधर मोहोळ

Muralidhar Mohol : नगर : लाल मातीतील कुस्ती ही विचार करायला लावणारी आहे. आपण मागे पडलो आहोत हे खरे असून आपल्याला ऑलम्पिक (Olympic) वीर पैलवान निर्माण करता आला नाही. यापुढे सर्वांनी एकत्र येऊन लाल मातीचे गत वैभव पुन्हा मिळून द्यायचे आहे. लाल मातीशी नाते असणारा माणूस ही स्पर्धा यशस्वी करू शकतो म्हणून आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra Kesari Competition) यशस्वीपणे पार पाडतील. अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा असून छबुराव रानबोके पासून बर्डे पर्यंत चांगले पैलवान निर्माण झाले आहे. अहिल्यानगरमध्ये होणारी स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यात यशस्वी ठरेल. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी १ कोटी रुपये देण्याचा आणि महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरींच्या पुरस्कार रकमेतही वाढ करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच्या स्पर्धेच्यावेळी घेतला आहे, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी केले. 

Muralidhar Mohol : लाल मातीचे गत वैभव मिळून द्यायचे - मुरलीधर मोहोळ
Muralidhar Mohol : लाल मातीचे गत वैभव मिळून द्यायचे – मुरलीधर मोहोळ

नक्की वाचा : लव्ह जिहाद, धर्मांतर व लँड जिहाद रोखण्यासाठी नाथ जागृती यात्रा : योगी बालकनाथ महाराज

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते माती पूजन सोहळा

अहिल्यानगर वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानातील माती पूजन सोहळा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. यावेळी अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, माजी आमदार अरुण जगताप, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, उपाध्यक्ष गुलाबराव बर्डे, सरचिटणीस हिंदकेसरी पै.योगेश दोडके, अशोक शिर्के, माजी उपमहापौर गणेश भोसले, संतोष भुजबळ,कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर, अविनाश घुले, अनिल गुंजाळ, रवींद्र कवडे, युवराज करंजुले आदी उपस्थित होते.

Muralidhar Mohol : लाल मातीचे गत वैभव मिळून द्यायचे - मुरलीधर मोहोळ
Muralidhar Mohol : लाल मातीचे गत वैभव मिळून द्यायचे – मुरलीधर मोहोळ

अवश्य वाचा : अखेर धनंजय देशमुख यांचं आंदोलन मागे!

आमदार संग्राम जगताप म्हणाले, (Muralidhar Mohol)

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वेगळे महत्व आहे. २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. राज्यातील मल्ल स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेतून देशभरातील मल्लांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे, हे वैभव आणखी वाढविण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे देशाचे लक्ष असून ते कुस्ती पाहण्यासाठी येत असतात, नगर जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे असून नगर दक्षिणला विमानतळ होण्यासाठी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.


आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले की, कुस्तीमुळे शरीर निरोगी आणि मन शुद्ध रहाते. जीवनात नवी ऊर्जा मिळते. लाल मातीत श्रम करताना पैलवानांनी चुकीच्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. कुस्ती क्षेत्र आता मागे पडत चालले असून क्रिकेटला महत्व प्राप्त झाले आहे. आता आपल्या सर्वांना पूर्वी प्रमाणे मानसन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे, व्यायामामुळे आमच्या वयाची जाणीव होत नाही आजच्या तरुणांना आम्ही लाजवेल, लाल मातीचा व्यायाम व शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे आणि जिमकडे आकर्षित झाले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने पैलवानांना प्रोत्साहन दिल्यास त्यांना पुढील कारकिर्दीसाठी ऊर्जा मिळेल नगर दक्षिण भागावर नेहमीच अन्याय झाला. जिल्ह्यातील प्रस्थापित लोकांशी संघर्ष करत असताना पैलवानकीमुळेच डावपेच कामी आले, असे त्यांनी सांगितले.