Murder : आजी-नातवाचा खून करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

Murder : आजी-नातवाचा खून करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

0
Murder
Murder

Murder : नगर : शेवगाव तालुक्यात आजी-नातवाचा खून (Murder) करणाऱ्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) सुनावली आहे. नेकपालसिंग पोटियासिंग चितोडीया (वय ६५) व कमलसिंग नेकपालसिंग चितोडिया (वय ३०, दोघे रा. केशरनगर, जामनेर रस्ता, भुसावळ, जि. जळगाव) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची (Accused) नावे आहेत. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल ढगे यांनी काम पाहिले.

नक्की वाचा: आम्ही असं आंदोलन केलं असतं तर गोळ्या घातल्या असत्या : अबू आझमी

शेवगाव – पाथर्डी जाणाऱ्या रस्त्या लगत ईदगाह मैदानावरील घटना


शेवगाव शहराजवळील शेवगाव ते पाथर्डी जाणाऱ्या रस्त्या लगत ईदगाह मैदानावर कमलबाई कागडियासिंग चितोडीया (वय ६५) व त्यांचा नातू सुनीलसिंग बुटासिंग चितोडीया (वय १०, दोघे रा. चितोडगड, राजस्थान) यांचा खून करण्यात आला होता. यात कमलबाई यांचा शिरच्छेद करून त्यांचे शिर दुसऱ्या बाजूला फेकून देण्यात आले होते. ही घटना २४ जानेवारी २०२१ ला घडली होती. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली. तसेच दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.

हे देखील वाचा: मनोज जरांगे पाटलांचा स्वतंत्र आरक्षणासाठी नकार

पुरावे व युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी (Murder)

सरकारी पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. पुरावे व युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात प्रत्येकी जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैदेची शिक्षा ठोठावली. पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यात प्रत्येकी सात वर्षे कारावास व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस साध्या कैदेची शिक्षा, तसेच जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सात वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैदेची शिक्षा तर कटाबद्दलच्या गुन्ह्यात प्रत्येकी जन्मठेपीची शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here