Murder : नवनागापूर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

Murder : नवनागापूर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

0
Murder : नवनागापूर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक
Murder : नवनागापूर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

Murder : नगर : नवनागापूर (ता. नगर) येथील आंधळे चौकात पत्नीशी व्हिडिओ कॉलवर (Video call) बोलणाऱ्या व्यक्तीचा डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून (Murder) करण्यात आला होता. या प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज (बुधवारी) जेरबंद केले. किरण बाळासाहेब गव्हाणे (वय २६, रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे.

नक्की वाचा: “मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल?”; पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य

व्हिडिओ काढत असल्याच्या संशयातून खून

नवनागापूर येथील अविनाश मिरपगार हे त्यांच्या पत्नी काजल मिरपगार यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते. त्यावेळी संग्राम कदम व त्याच्या चार साथीदारांनी व्हिडिओ काढत असल्याच्या संशयातून अविनाशला शिवीगाळ केली. तसेच अविनाशच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून केला. या प्रकरणी काजल मिरपगार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला.

अवश्य वाचा : पोलीस भरतीसाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू; या रस्त्यावर राहणार एकेरी वाहतूक

स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपी घेतले ताब्यात (Murder)

या प्रकरणातील आरोपी किरण गव्हाणे हा घटनेपासून फरार होता. किरण हा त्याच्या घरी शनिशिंगणापूर येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी किरणला ताब्यात घेतले. पथकाने पुढील तपासासाठी आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here