Murder : नगर : घराच्या जागेवरुन सुरु असलेला वाद थेट जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. पारनेर (Parner) तालुक्यात ही घटना घडली आहे. शेजारीच राहत असलेल्या दोन कुटुंबात जागेवरुन वाद सुरु होता. या वादाचं रुपांतर हत्येत झालं. आरोपीनं (accused) महिला आणि तिच्या अडीच वर्षांच्या मुलावर कार घालून या दोघांची हत्या (Murder) केली.
नक्की वाचा : ‘शांतीकुमारजी फिरोदिया’ फाउंडेशन बुद्धिबळाच्या प्रचार, प्रसारासाठी कटिबद्ध : नरेंद्र फिरोदिया
शितल येणारे आणि स्वराज येणारे हे पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये राहत होते. हल्लेखोर आरोपी श्रीमंदिलकर हा त्यांच्या घराशेजारीच राहत होता. घरा शेजारी असलेल्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु होता. याच वादातून ही घटना घडली असल्याचा आरोप येणारे कुटुंबीयांनी केला आहे. भरधाव कार अंगावर घातल्याने महिलेसह तिच्या अडीच वर्षाच्या मुलाचा देखील जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी(ता.२४) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
हे देखील वाचा : नगर जिल्ह्यात ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.