Murder : नगर : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या अमोल मुरलीधर थोरात याचा ३१ मे २०२० रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खून (Murder) झाला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) आरोपी रोहन राजेंद्र वडागळे (वय २४, रा. भिस्तबाग, नगर) याला दोषी धरत जन्मठेप (Life Imprisonment) व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आर. एल. कोळेकर यांनी काम पाहिले.
अवश्य वाचा : लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली;दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल
भांडण सोडवताना धक्का लागल्याने रागातून खून
पूर्ववैमनस्यातून किरकोळ कारणावरून दोन गटात वाद सुरू होते. हा वाद सोडवण्यासाठी शेजारी असलेल्या फेब्रिकेशन दुकानात काम करणारा अमोल थोरात गेला. भांडण सोडवताना त्याच्याकडून राजेंद्र वडागळे यांना धक्का लागला. यात राजेंद्र वडागळे खाली पडले. याचा राग आल्याने रोहन वडागळे याने कैची घेऊन अमोल थोरातचे पोट व काखेत वार केले. त्यामुळे अमोल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी विवेक थोरात याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत रोहन वडागळे व आणखी तीन आरोपींना अटक केले.
नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा’- संजय राऊत
उर्वरित तीन जणांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता (Murder)
पोलिसांनी न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी विवेक थोरात, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी, मनोहर तुळशीराम रोकडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने साक्षी पुरावे तपासत रोहनला दोषी ठरविले. तर उर्वरित तीन जणांना पुराव्या अभावी निर्दोष सोडून देण्यात आले.