Murder : नगर : पांगरमल (ता. नगर) पुन्हा चर्चेत आले आहे. आज (गुरुवारी) पहाटे चोर असल्याच्या संशयातून एका महिलेसह तीन जणांना पांगरमल येथील जमावाने मारहाण केले. यात एकाचा मृत्यू (Murder) झाला तर महिलेचा विनयभंग झाल्याची फिर्याद (Complaint) एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात दाखल झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी सरपंच अमोल आव्हाडसह २० ते २५ जणांवर हत्या, जीवघेणा हल्ला, विनयभंग व ॲट्रासीटीचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
नक्की वाचा : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू
विषारी दारूमुळे पांगरमल आले होते चर्चेत
२०१६ साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी विषारी दारू पिल्याने १९ जणांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यानंतर आता पुन्हा पांगरमल चर्चेत आले आहे. पांगरमल येथील एका व्यक्तीच्या शेळ्या चोरीला गेल्याचा आरोप करत पांगरमलमधील महादेव आव्हाड, सरपंच अमोल आव्हाड, उद्धव महादेव आव्हाड, आजीनाथ महादेव आव्हाड, गणेश अंबादास आव्हाड, संदीप पंढरीनाथ आव्हाड व गावातील २० ते २५ जणांनी पीडिता, तिचा मुलगा व तिचा दीर यांना मारहाण केली.
अवश्य वाचा : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीतील कीर्तनकाराला जीवे मारण्याची धमकी
जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू (Murder)
या मारहाणीत पीडितेच्या दिराचा मृत्यू झाला. ही मारहाण सुरू असताना आरोपींनी पीडितेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली.