Murder : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Murder : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

0
Murder : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
Murder : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Murder : नगर : रागाच्या भरात पत्नीचा खून (Murder) करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वसंत लक्ष्मण शिंदे (वय ५२, रा. गुंजाळे, ता. राहुरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे (Accused) नाव आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले.

नक्की वाचा : नवाब मलिक यांना कोर्टाचा दिलासा;वेेद्यकीय जामीन मंजूर

भांडणात केलेल्या मारहाणीत मृत्यू

वसंत शिंदे हा त्याच्या पत्नीसह एका कोपीमध्ये राहत होता. त्याच्या कोपीपासून काही अंतरावर त्याची मुलगी बाली निकम राहते. वसंतची पत्नी अलकाबाई एकदा बालीजवळ आली. तिने वसंत व तिच्यातील भांडणाविषयी तसेच वसंत दारू पिऊन मारहाण करत असल्याने मुलाकडे रहायला जायचे असल्याचे बालीला सांगितले. तीन दिवसांनी म्हणजे १८ ऑगस्ट २०२१ रोजी अलकाबाई व वसंत शिंदे यांच्यात भांडण झाले. भांडणात वसंतने केलेल्या मारहाणीत अलकाबाई गंभीर जखमी होऊन खाली पडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे भेदरलेल्या वसंत शिंदेने ही बाब मुलगी बालीला सांगितली. बाली धावत आईजवळ गेली. मात्र, आई अलकाबाई हलचाल करत नसल्याने तिने हंबरडा फोडला. तिचा आवाज ऐकून लोक जमा झाले. त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलीस आल्यावर अलकाबाईंचा मृत्यू झाल्याचे बालीला कळले.

अवश्य वाचा : नगरमध्ये १२ ऑगस्ट रोजी धडकणार मराठ्यांचे वादळ; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सुरू

उपलब्ध पुराव्यांच्या आधारे शिक्षा (Murder)

या प्रकरणी बालीने वडील वसंत शिंदे विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पुरावे व दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी बाली निकम, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आदींचा समावेश होता. आरोपीकडून हस्तगत केलेले रक्ताने भरलेले कपडे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here