Murder : नगर : श्रीरामपूर येथे घरात घुसून कुऱ्हाडीचे वार करत एकाचा खून (Murder) तर दोघांना गंभीर जखमी (Seriously Injured) करणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. आकाश इंद्रभान बर्डे (वय २२, रा. भोसले खान, वळदगाव, ता. श्रीरामपूर) व एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा जेरबंद आरोपीत समावेश आहे.
अवश्य वाचा : महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा शासनाची प्रतिमा उंचावणारा ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद
श्रीरामपूरमधील आदर्शनगर येथे घरात घुसून आरोपींनी साहिल सय्यद याला कुऱ्हाडीने मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी साहिलची आजी शम्मा पठाण त्याला वाचविण्यासाठी मधे आल्या असता त्याच्या डोक्यात आरोपींनी कुऱ्हाडीचे वार केले. साहिलची बहीण मेहेक सय्यद हिच्यावरही कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या घटनेबाबत मुन्ना पठाण यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी खून व जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल करून घेतला होता.
नक्की वाचा: मनोज जरांगेंना मोठा दिलासा! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द
स्थानिक गुन्हे शाखेची तत्पर कारवाई (Murder)
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीरामपूरमधील घटनास्थळी गेले. तेथे आरोपीचा शोध घेत असताना पथकाला माहिती मिळाली की, आरोपी आकाश बर्डे हा त्याच्या साथीदारासह पढेगाव येथून रेल्वेने कोठे तरी जाण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार पथकाने पढेगाव रस्त्याने जात असताना आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता गावातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा गुन्हा केल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानुसार पथकाने पुढील तपासासाठी जेरबंद आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.