Murder : पतीचा खून करणारी वकील पत्नी प्रियकरासह गजाआड

Murder : पतीचा खून करणारी वकील पत्नी प्रियकरासह गजाआड

0
Murder

Murder : नगर : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे पतीचा खून (Murder) करणाऱ्या वकील पत्नीला पोलिसांनी (Police) तिच्या प्रियकरासह ताब्यात घेतले आहे.  स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) व नेवासा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. लहू शिवाजी डमरे (वय ३१, रा. ढोकसळ, ता. बदनापूर, जि. जालना) व मीना अंबादास म्हस्के (वय ३६, रा. रमाबाई नगर, जुना जालना, मोतीबागजवळ, ता. जि. जालना) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.

नक्की वाचा: अजित पवारांच्या सभेत मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी

स्थानिक गुन्हे पथक व नेवासा पोलिसांनी संयुक्त केला तपास

पाचेगाव शिवारातील एका मेडिकल कॉलेजच्या जवळील शेतात एक अनोळखी मृतदेह आढळून आला. या संदर्भात पोलीस पाटील संजय वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व नेवासा पोलिसांच्या पथकाने संयुक्त तपास सुरू केला.

अवश्य वाचा: समन्यायी पाणी वाटपाचा संघर्ष टळला; जायकवाडीच्या जलसाठा ६७ टक्क्यांच्या पुढे

गळा दाबून व धारदार शस्त्राने वार करून केला खून (Murder)

पथकाने १५ दिवस अथक परिश्रम करून पाचेगावमधील रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. तसेच इतर तांत्रिक पुरावे मिळविले. यातून एक वाहन पथकाला संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले. त्यानुसार पथकाने वाहन मालक अंबादास भानुदास म्हस्के (रा. रमाबाई नगर, जुना जालना, ता. जि. जालना) यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता १५ दिवसांपासून त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे पोलीस पथकाच्या लक्षात आले. अंबादास म्हस्के यांच्या पत्नी मीना हिची माहिती घेतली असता ती लोणी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे भाडोत्री खोली घेऊन राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. 


पथकाने काल (गुरुवारी) लोणी (ता. इंदापूर) येथे जाऊन मीना म्हस्के हिचा शोध घेतला. त्यावेळी ती लहू डमरे बरोबर मिळून आली. दोघांकडे अधिक विचारपूस केली असता मीना व लहूचे प्रेम संबंध होते. याबाबत मीनाचा पती अंबादासला संशय होता. त्यातून तो तिला त्रास द्यायचा. एकदा मीनाने पुणे जिल्ह्यातील इंदापूरला काम असल्याचे सांगत अंबादास म्हस्केला बरोबर घेतले. रस्त्यात वाहनात बसलेल्या अंबादासचा मीना व लहूने गळा दाबून खून केला. त्याला खाली पाडून गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा मृतदेह फेकून देण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.