Murder : नगर : पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकूळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली. या टोळीने तिसगाव (ता. पाथर्डी) येथील वृद्धाचा खून (Murder) केला होता. तसेच या टोळीवर इतरही १४ गुन्हे (Crime) दाखल आहेत.
नक्की वाचा: विदर्भात पावसाचे थैमान! हवामान विभागाकडून अलर्ट जारी
शेळ्या व कोंबड्या चोरण्याचा प्रयत्न
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मच्छिंद्र तुकाराम ससाणे हे त्यांच्या घरी झोपलेले असताना काही चोर तेथे आले. त्यांनी शेळ्या व कोंबड्या चोरण्याचा प्रयत्न करताच मच्छिंद्र ससाणे यांनी चोरांना विरोध केला. चोरांनी धारदार शस्त्राने मच्छिंद्र ससाणे यांच्या डोक्यावर वार केला. यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बाळासाहेब ससाणे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला.
अवश्य वाचा: मोठी बातमी! मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार
सहा आरोपींना केले जेरबंद; तर चार आरोपी पसार (Murder)
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळा जवळील व परिसरातील गावांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात तीन दुचाकीवरून १० आरोपी जात असल्याचे दिसून आले. या आरोपींबाबत पथकाने माहिती काढली असता, हे आरोपी माळीबाभुळगाव येथील वाळके वस्तीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्यातील सहा आरोपींना जेरबंद केले. तर चार आरोपी पसार झाले.
उमेश रोशन भोसले (वय २६, रा. साकेगाव, ता. पाथर्डी), दौलत शुकनाश्या काळे (वय २५, रा. माळीबाभुळगाव, ता. पाथर्डी), सिसम वैभव काळे (रा. माळीबाभुळगाव, ता. पाथर्डी), शिवाजी रोशन भोसले (रा. साकेगाव, ता. पाथर्डी), आकाश शेरू काळे (रा. बाभुळगाव, ता. पाथर्डी) व एक १४ वर्षीय मुलगा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जेरबंद आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चार साथीदारांची नावे सांगितली. सेशन रायभाण भोसले (रा. साकेगाव, ता. पाथर्डी), किशोर रायभान भोसले (रा. साकेगाव, ता. पाथर्डी), आज्या सुरेश भोसले (रा. टाकळीफाटा, ता. पाथर्डी) व लोल्या सुकनाश्या काळे (रा. माळी बाभुळगाव, ता. पाथर्डी) अशी पसार आरोपींची नावे आहेत.
जेरबंद आरोपींतील नामदेव भोसले हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी खून, दरोडा, जबरी चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. दौलत काळेवर घरफोडीचे तीन गुन्हे, लोल्या काळेवर दरोड्याचे चार गुन्हे व किशोर भोसले याच्यावर दरोडा व जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासासाठी पथकाने जेरबंद आरोपींना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.