Murder : दिराने केली दोन भावजयींची कोयत्याने हत्या

Murder : दिराने केली दोन भावजयींची कोयत्याने हत्या

0
Murder : दिराने केली दोन भावजयींची कोयत्याने हत्या
Murder : दिराने केली दोन भावजयींची कोयत्याने हत्या

Murder : अकोले: तालुक्यातील बेलापूर येथे सोमवारी (ता.7) दुपारच्या सुमारास दशक्रिया विधीचे पैसे दिले नाही म्हणून झालेल्या वादातून लहान भावजयीची कोयत्याने वार करत हत्या (Murder) केली. तर सोडवायला गेलेल्या चुलत भावजयीचाही कोयत्याने सपासप वार करत हत्या केली. या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) पसार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. उज्ज्वला अशोक फापाळे (वय 38) आणि त्यांची चुलत जाऊबाई वैशाली संदीप फापाळे (वय 40) असे या हत्याकांडातील मृत (Dead) महिलांची नावे आहेत. तर दत्तात्रय प्रकाश फापाळे (वय 50) असे आरोपी दिराचे नाव आहे.

नक्की वाचा: राहुरीत तनपुरे व कर्डिले यांच्यातच लढतीची शक्यता

दशक्रियासाठी केलेला खर्च मागितल्याने वाद

अकोले पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पंचानामा केला. दरम्यान, मयत उज्ज्वला यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. यानंतर त्या कामानिमित्त आळंदी येथे राहत आहे. शेतातील सोयाबीन काढण्यासाठी त्या घरी आल्या होत्या. त्याचवेळी त्यांचा दीर दत्तात्रय फापाळे हा त्यांना म्हणाला, ‘तुझ्या पतीच्या दशक्रियासाठी मी खर्च केला आहे, ते पैसे माझे देऊन टाक’ यावरून वाद झाला आणि त्याने कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार करत खून केला.

अवश्य वाचा: शेअर मार्केटमध्ये गेलेले पैसे मिळविण्यासाठी तरुण करायचा राज्यभर घरफोडी

चुलत जाऊबाई मध्ये पडल्याने त्यांचीही हत्या (Murder)

यावेळी भावकीतील वैशाली फापाळे ही महिला उज्ज्वला यांना वाचवण्यासाठी मधे पडल्याने दत्तात्रय याने वैशाली यांच्यावरही कोयत्याने वार करून हत्या केली. मयत उज्ज्वला यांना दोन लहान मुले आहेत. मुलांना त्यांनी माहेरी ठेवले होते. त्यामुळे ही दोन लहान मुले वाचली आहेत. मात्र, भांडण सोडवायला मधे पडलेल्या वैशाली फापाळे यांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुहेरी हत्याकांड करून आरोपी पसार झाला होता. हातात कोयता घेऊन जातानाचा त्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. त्यानंतर अकोलेचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे तातडीने घटनास्थळी पोहोचले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनीही घटनास्थळी धाव घेत पोलिसांना तपासाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. त्यावरून तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. मात्र, या घटनेने अकोले तालुका हादरून गेला आहे.