Murder : जादूटोण्याच्या संशयातून महिलेचा खून; आरोपीला दौंड तालुक्यातून अटक

Murder : जादूटोण्याच्या संशयातून महिलेचा खून; आरोपीला दौंड तालुक्यातून अटक

0
Murder : जादूटोण्याच्या संशयातून महिलेचा खून; आरोपीला दौंड तालुक्यातून अटक
Murder : जादूटोण्याच्या संशयातून महिलेचा खून; आरोपीला दौंड तालुक्यातून अटक

Murder : नगर : नेवासे तालुक्यातील झापवाडी येथे वृद्ध महिलेचा खून (Murder) करून मृतदेह (Dead body) मुळा कॅनॉल लगत फेकून देण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने महादेव आनंदा महारनवर (वय ५५, रा. एकेरीवाडी, ता. दौंड, जि. पुणे) या आरोपीला काल (ता. १४) अटक केली. महिला जादूटोणा करत असल्याच्या संशयातून हा खून करण्यात आल्याचे पोलीस (Police) तपासात समोर आले आहे.

नक्की वाचा: मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी,राज्य सरकारचा मोठा निर्णय

सीसीटीव्हीच्या आधारे काढली आरोपीची माहिती

झापवाडीतील कॅनॉल लगत १६ सप्टेंबर रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी सोनई पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे महिलेची माहिती काढली असता तिचे नाव जिजाबाई भाऊसाहेब रुपनवर (वय ७०, रा. एकेरीवाडी, ता. दौंड, जि. पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे महिलेचे नातेवाईक व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची माहिती काढली. खुनाच्या दिवशी वापरण्यात आलेल्या दुचाकीचा बल्ब काष्टी (ता. श्रीगोंदे) येथील गॅरेजमधून बदलल्याचे समोर आले. तेथील सीसीटीव्ही व तांत्रिक माहितीच्या आधारावर हा गुन्हा महादेव महारनवर याने केल्याचा संशय पथकाला आला. 

अवश्य वाचा: खड्डे मुक्त शहराची निर्मिती करण्याचे काम सुरु आहे : संग्राम जगताप

स्कार्पने गळा आवळून खून (Murder)

पथकाने महादेव महारनवरला दौंड तालुक्यातील एकेरीवाडी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक माहिती काढली असता त्याने पथकाकडे गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पथकाला सांगितले की, १५ सप्टेंबर रोजी महादेव व जिजाबाई दोघे दुचाकीवरून शनिशिंगणापूर येथे चालले होते. त्यावेळी दुचाकी एकेरीवाडीतील कॅनॉल जवळ आली असता जिजाबाई रुपनवरने दुचाकी थांबवायला लावली. तिने जवळील शेतात जाऊन महादेव सह पूजा सुरू केली. जिजाबाई आपल्यावर जादूटोणा करत असल्याचा संशय महादेवला आला. या संशयातून त्याने गळ्यातील स्कार्पने जिजाबाईचा गळा आवळून खून केला. तिच्या कानातील सोन्याचे दागिने काढून नेले होते, असे त्याच्याकडून कळाले. त्यानुसार पथकाने महादेवला अटक केली. गुन्ह्याच्या तपासात पथकाने ५६ हजार रुपये किंमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. पथकाने पुढील तपासासाठी आरोपीला सोनई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.